अजित पवारांसोबत गेलेले आमदार आता म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

अजित पवारांसह सकाळी राजभवनात गेलेले आमदार. सकाळी 9 आमदार पवारांसह होते. यातील काही आमदार पुन्हा शरद पवारांकडे आले. त्या आमदारांनी सोशल मीडियावरून आपण राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले. 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणाला धक्कादायक अशी सकाळ आज बघावी लागली. आज (ता. 23) सकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या धक्कातंत्राने संपूर्ण राजकारणच ढवळून निघाले. या राजकीय नाट्यात सगळ्यांच्या नजरेसे पडले ते, अजित पवारांसह सकाळी राजभवनात गेलेले आमदार. सकाळी 9 आमदार पवारांसह होते. यातील काही आमदार पुन्हा शरद पवारांकडे आले. त्या आमदारांनी सोशल मीडियावरून आपण राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'हे' फुटीर आमदार पवार यांच्याबरोबर होते
माणिकराव कोकाटे
नरहरि झिरवाळ
धंनजय पुंडे
राजेंद्र शिंगणे
सुनील भुसारा
सुनील शेळके
संदिप क्षिरसागर
दिलीप बनकर
अनिल पाटील

'हे' आमदार होते अजित पवार यांच्यासोबत..

यातील राजेंद्र शिंगणे, सुनील शेळके, सुनील भुसारा, संदीप क्षिरसागर हे पुन्हा पवारांकडे आले. तर दिलीप बनकर, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे की, आम्ही पक्षासोबतच आहोत.

माणिकराव कोकाटे म्हणतात, 'मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही.अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरुन मी राजभवनावर गेलो होतो. गटनेते असल्याने आदेश पाळला.तिथे कायय होणार आहे याबाबत काहीच माहीत नव्हते.पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय आपण कदापीही बदलणार नाही.!'

रात्री राष्ट्रवादीसोबत अन् सकाळी फडणवीसांसोबत; अजित पवारांना घेतले फैलावर

तर नरहरी झिरवळ म्हणतात, 'मी राष्ट्रवादीबरोबरच आहे. शरद पवार साहेब आमचे दैवत आहे, अफवांवर विश्वास ठेवू नये.'

दिलीप बनकर यांनी म्हणले आहे की, 'मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासोबत आहे. माझा आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. अजित पवार गटनेते असल्याने त्यांनी सांगितले राजभवनात या म्हणून गेलो, आम्हाला तिथे काय होईल याची कल्पना नव्हती.'

या सर्व ट्विटवरून अजित पवारांसह गेलेले नेतेही पुन्हा शरद पवारांकडे आल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 NCP MLA Tweets about they are with NCP