esakal | 'हे' आमदार होते अजित पवार यांच्यासोबत..
sakal

बोलून बातमी शोधा

'हे' आमदार होते अजित पवार यांच्यासोबत..

'हे' आमदार होते अजित पवार यांच्यासोबत..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिवसेनेला धक्का देत अजित पवार यानी भाजपला पाठींबा दिलाय. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान हे सर्व राजकीय नाट्य सुरु असताना, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना अजित पवार यांच्यासोबत कोण कोण होतं याबाबतची माहिती आता समोर येतेय. 

'हे' फुटीर आमदार पवार यांच्याबरोबर होते

  • माणिकराव कोकाटे
  • नरहरि झिरवाळ
  • धंनजय पुंडे
  • राजेंद्र शिंगणे
  • सुनील भुसारा
  • सुनील शेळके
  • संदिप क्षिरसागर
  • दिलीप बनकर
  • अनिल पाटील

मात्र,  सर्व प्रकार समोर आल्यानंतर यामधील सुनील शेळके, सुनील भुसारा, संदीप क्षिरसागर हे परत आलेत. परत आलेल्या या आमदारांनी शरद पवार यांना पाठींबा दिला.

"अजित पवार आमच्या नजरेशी नजर मिळवू शकले नाहीत"

दरम्यान 'अजित पवार रात्रभर आमच्यासोबत होते, पण आमच्या नजरेशी नजर मिळवू शकले नाहीत. त्यांच्या मनात वाईट विचार होते म्हणूनच असं झालं. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत
 

"अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया"

या सर्व घडामोडी झाल्यानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया सामोर आलीये. यामध्ये "आता काहीही बोलायचं नाही, माझ्या सोयीने भूमिका मांडीन" असं वक्तव्य अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलंय. त्यामुळे अजित पवार आपल्या मनातील भावना स्पष्ट करणार आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या शांततेमागे मोठं वादळ दडलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 

महाराष्ट्रातील राजकीय नट्यानंतर अजित पवार यांची 'पहिली' प्रतिक्रिया

Webtitle : these MLAs we with ajit pawar while taking oath as deputy CM

loading image