कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहता उल्हासनगरमध्ये ३०० अतिरिक्त बेड्सचं सेंटर

corona patients beds
corona patients beds
Updated on

मुंबई: मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा २० हजारांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. मुंबई आणि आजुबजुच्या सर्व शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण काही कमी होताना दिसत नाहीये. त्यात हा आकडा आता पुन्हा वाढणार का अशी चिंता सर्वांना आहे. म्हणूनच आता विविध शहरांच्या महापालिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अधिक रुग्णांची सोय करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. 

उल्हासनगर इथे  गेल्या महिनाभरात तब्बल १२६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची आणि घेण्यात आलेल्या स्वॅब कलेक्शनची संख्या गृहीत धरून रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे उल्हासनगरात कोविड-19 रुग्णालयासाठी अतिरिक्त ३०० बेड्सची सोया करण्याची तयारी महापालिकेनं दाखवली आहे. 

उल्हासनगरमध्ये ३०० बेड्सची सोय करण्यासाठी महापालिकांना काही संस्था आणि काही डोनेटर्स मदत करणार आहेत. त्यासाठी डोनेटर्स पुढे येत असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे. स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नरेंद्रकुमारी ठाकूर, टॅक्स विभागाचे अनिल खतूरानी यांच्या उपस्थितीत आयुक्तांनी याबद्दलची माहिती दिली आहे. 

पालिका मुख्यालयात मागवण्यात आलेल्या सव्वा सहा फुटाच्या फुल साईज बेड्सची पाहणी केल्यावर आणि त्याचा दर्जा तपासण्यात आल्यावर सुधाकर देशमुख यांनी समाधान व्यक्त केलंय. 

300 beds will make in ulhasnagar said commisioner read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com