
Jyoti Hotel Fire: मुंबईतील अंधेरी पूर्व येथील चाकाला परिसरातील ज्योती हॉटेलला मध्यरात्री भीषण आग लागली होती. सध्या ही आग विझवण्यात आली असली तरी यामध्ये हॉटेलचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अग्निशमन दलानं मोठ्या शर्थीनं प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली. यावेळी हॉटेलमध्ये ३५ नागरिक होते, त्यांना सुखरुपणे बाहेर काढण्यातही यश आलं आहे.