कोरोनाशी लढण्यास 'असा' सज्ज झालाय महाराष्ट्र...

कोरोनाशी लढण्यास 'असा' सज्ज झालाय महाराष्ट्र...

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सज्ज असून राज्यभरात 39 विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये 361 खाटांची व्यवस्था उपलब्ध असून जिल्हा रुग्णालय तसेच पालिकांच्या आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचे निदान करण्यासाठी एनआयव्ही पुणे, कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळा मुंबई, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या 3 ठिकाणी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. आवश्‍यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाचे निरिक्षक डॉ.प्रदीप आवटे यांनी दिली. 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारपर्यंत 66,977 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व कोरोना बाधित देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावरच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. 

18 जानेवारीपासून राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 167 जणांना दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 161 जणांचे नमुने निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. 167 प्रवाशांपैकी 158 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 7 जण मुंबईत; तर नाशिक व नांदेड येथे प्रत्येकी एक जण भरती आहेत. 

  • चीनवरून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात भरती करावे. 
  • बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असल्यास विलगीकरण कक्षात भरती करुन त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे. 
  • बाधित देशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांसाठी घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगावे. 
  • बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील 14 दिवस प्रत्येक प्रवाशावर देखरेख ठेवावी. त्यांच्यामध्ये क.ोरोनासदृश्‍य लक्षणे आहेत की नाही, याबाबत तपासणी करावी. 

बाधित देशातील 293 प्रवाशी निरीक्षणाखाली 

बाधित देशातून महाराष्ट्रात आलेल्या 454 प्रवाशांपैकी 293 जणांचा 14 दिवसांची तपासणी पूर्ण झाली आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह गडचिरोली, नांदेड, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, नाशिक, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचीही तपासणी करण्यात येत आहे. 

टोल फ्री नियंत्रण कक्ष 

पुण्याच्या आरोग्य सेवा केंद्राच्या संचालकांच्या कार्यालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी कोरोनाबाबत टोल फ्री सेवा उपलब्ध असून सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत संपर्क साधता येईल. 020-26127394 आणि 104 हा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केली आहे.  

39 isolation centers and 3 labs maharshtra is set to fight corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com