esakal | पावसाळ्याचे वेध लागले हो..! कर्नाळा अभयारण्यात तिबोटी खंड्याचे घडले दर्शन...
sakal

बोलून बातमी शोधा

khandya

निसर्गातील अनेक बदल पावसाचे संकेत देत असतात. अशाच प्रकारे पावसाळ्याचे संकेत देणाऱ्या तिबोटी खंड्याचे मंगळवारी (ता.26) कर्नाळा अभयारण्यात आगमन झाले.

पावसाळ्याचे वेध लागले हो..! कर्नाळा अभयारण्यात तिबोटी खंड्याचे घडले दर्शन...

sakal_logo
By
दीपक घरत

पनवेल : सध्या तळपत्या उन्हामुळे तापमान चांगलेच वाढले आहे. आगामी खरीप हंगामाची बळिराजा तयारी करत आहे. पावसाळा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असून उन्हापासून सुटका होण्यासाठी प्रत्येक जण पावसाची प्रतिक्षा करत आहे. निसर्गातील अनेक बदल पावसाचे संकेत देत असतात. अशाच प्रकारे पावसाळ्याचे संकेत देणाऱ्या तिबोटी खंड्याचे मंगळवारी (ता.26) कर्नाळा अभयारण्यात आगमन झाले.

मोठी बातमी ः महाराष्ट्रात पुन्हा येणार मोठा राजकीय भूकंप ? शरद पवारांची मातोश्रीवर हजेरी, दीड तास चर्चा...

भारतात आढळणाऱ्या खंड्या पक्ष्यांच्या प्रजातींमधील तिबोटी खंड्या हा आकाराने सर्वात लहान खंड्या आहे. या पक्ष्यांच्या समावेश स्थलांतरित पक्ष्यांमध्ये होत असून दरवर्षी दक्षिण भारतातून हा पक्षी प्रजननासाठी मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रात येतो. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरदरम्यान पुन्हा दक्षिण भारताच्या दिशेने स्थलांतर करतो. या पक्षाचा विणीचा काळ अत्यंत नाजूक मानला जातो. कारण, याच कालावधीत हे पक्षी प्रजनन करुन आपली संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात असतात. 

मोठी बातमी ः संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, महाराष्ट्रातील सरकारबाबत केलं 'मोठं' भाष्य...

सर्वसाधारणपणे नदी, ओढे यांच्या वरच्या बाजूस पाणीपातळीचा अंदाज घेऊन मातीमध्ये हे पक्षी बीळ खणून त्यामध्ये घरटे तयार करतात. महत्वाचे म्हणजे आपत्ती काळात पर्याय म्हणून दुसरे घरटे देखील हे पक्षी जवळच तयार करतात. गेल्या वर्षी पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी पक्षी निरीक्षक व अभ्यासक यांच्याशी चर्चा करून 15 जुलै 2019 पर्यंत छायाचित्रे काढण्यास व अधिवास परिसरात जाण्यास बंदी घातली होती. या कालावधीत ग्रीन नेटने संरक्षित केलेल्या या क्षेत्रात वनरक्षक म्हणून युवराज मराठे यांनी काम पाहिले होते.

(छायाचित्र सौजन्य ः  युवराज मराठे)