रॅपीड अँटीबॉडीज किटचा होणार अभ्यास ;चार सदस्यीय समिती गठीत... 

भाग्यश्री भुवड 
रविवार, 12 जुलै 2020

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत केली आहे.

मुंबई: भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत केली आहे.

विविध कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसात शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. 

 हेही वाचा: सावधान! 'या' प्रकारच्या कोविड रुग्णांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका; केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांचा धक्कादायक निष्कर्ष..

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, प्रा. डॉ. अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. यासंदर्भात शनिवारी आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

हे राहील समितीचे कार्य: 

-- आयसीएमआरने रॅपीड ॲण्टी बॉडी चाचण्यांसाठी शिफारस केलेल्या विविध चाचणी प्रणाली, किट यांचा अभ्यास करून त्यापैकी सर्वच अथवा निवडक चाचणी प्रणालीचा आणि किटचा राज्यात वापर करण्याची शिफरस करणे.

-- या चाचण्या पोलिस, आरोग्य सेवेशी निगडीत संवर्ग, स्वच्छता कामगार, तसेच सामान्य जनता यांच्यावर करायच्या की निवडक संवर्गावर कराच्या याबाबत शिफारस करावी.

हेही वाचा: स्टँडअप कॉमेडी शोसाठी कठोर सेन्सॉरशिप हवी; आमदार मनीषा कायंदे यांची मागणी..

-- शिफारस केलेल्या चाचण्या व किटच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) मसुदा तयार करून आरोग्य विभागाला सादर करायचा आहे.

 

संपादन : अथर्व महांकाळ 

4 members committee will study rapid testing kits in state 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 members committee will study rapid testing kits in state