esakal | सावधान! 'या' प्रकारच्या कोविड रुग्णांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका; केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांचा धक्कादायक निष्कर्ष..

बोलून बातमी शोधा

heart attack

कोरोना रुग्णांच्या रक्तात गुठळ्या होऊन हार्ट अटॅक येत असून रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे पालिकेच्या केईएम रुग्णालयातील डाॅक्टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. 

सावधान! 'या' प्रकारच्या कोविड रुग्णांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका; केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांचा धक्कादायक निष्कर्ष..
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोना रुग्णांच्या रक्तात गुठळ्या होऊन हार्ट अटॅक येत असून रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे पालिकेच्या केईएम रुग्णालयातील डाॅक्टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. 

डॉक्टरांनी त्यांच्याकडील रुग्णांचा अभ्यास केला. त्यात त्यांना लक्षात आले की करोनामुळे अनेकांच्या रक्तात गुठळ्या होतात, आणि त्यानंतर त्यांना अटॅक येतो. असे आतापर्यंत जवळपास 30 रुग्ण हार्ट अटकने दगावले. विशेष म्हणजे याामध्ये काहींना ब्लड प्रेशर किंवा मधुमेह हे इतर आजार देखील नव्हते. 

लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेची दमदार कामगिरी; मुंबई विभागाने केली 'इतक्या' लाख वॅगन्सची मालवाहतूक...

काही दिवसांपूर्वी 35 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांना इतर कोणतेही आजार नव्हते. त्यांच्या एक्स- रे मध्ये त्यांना कोविडसह न्यूमोनियाचे निदान झाले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यानंतर, त्यांची प्रकृती ठिक होती. मात्र, 5 दिवसांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यांच्या ऑक्सिजनची पातळी खालावली. त्यानंतर त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला आणि त्यांचा रिपोर्ट नाॅर्मल आला. 

या रुग्णाचा 2 डी इको करण्याचा सल्ला ज्येष्ठ कार्डिओलाॅजिस्ट डाॅ. चरण लांजेवार यांनी दिला. त्या तपासणीत त्यांच्या ह्रदयाच्या भिंतीच्या( लेयर) मधल्या थराची जळजळ होत आहे. त्यातून त्यांची प्रकृती आणखी गंभीर होऊ शकते हे लक्षात येताच डाॅक्टरांनी त्यांचे उपचार बदलले आणि त्यांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले. 

केईएम रुग्णालयात नेमण्यात आलेल्या मल्टिस्पेशालिटी टास्क फोर्समधील डाॅक्टरांची दररोज वेगवेगळ्या कारणांनी गंभीर झालेल्या कोरोना रुग्णांच्या तब्येतीविषयी बैठक होते. त्या चर्चेतून रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार केले गेले पाहिजे यावर सल्ला मसलत केली जाते. शिवाय, कोणते उपचार केले तर रुग्ण दगावण्याची जी संभावना आहे ती कमी होईल. अशा अनेक विषयांवर चर्चा करुन निष्कर्ष काढले जातात. 

...तर वीजग्राहकांना होऊ शकतो 750 रुपयांचा दंड; वाचा सविस्तर...

नेमका काय आहे अभ्यास ? 

कोणत्याही महामारीत रोगाचा नेमका कोणता प्रकार आहे? याविषयी एक टीम ( एपीडेमिओलाॅजिस्ट) सतत अभ्यास करत असते. ही टीम आजार कसा पसरतो, आजाराचा नेमका कोणता प्रकार आहे यावर अभ्यास करत असते. या अभ्यासातून उपचार देऊनही काही रुग्ण दगावत आहेत असे समजले. याची कारणे शोधण्याचे काम ही टीम करते. 

सामान्यतः 40 ते 45 वयोगटातील लोकांना मधुमेह वगैरे असे आजार होत नाहीत. पण, ज्यांना कधीच मधुमेह नव्हता अशा 10 टक्के रुग्णांना कोरोनामुळे मधुमेह झाला होता आणि तो 300 ते 400 च्या घरात पोहोचला होता असे निदर्शनास आले. तसंच, जोपर्यंत या रुग्णांचा ब्लड शुगर कमी होत नाही तोपर्यंत केलेल्या उपचारांचा काही फायदा होत नाही. त्यामुळे, या रुग्णांचा मधुमेह आधी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला गेला. 

याचबरोबर 70 ते 80 रुग्णांना सेंट्रल ओबेसिटी म्हणजेच पोट ही सुटलेले होते. असे हे रुग्ण होते ज्यांची शुगर वाढली होती पण, मधुमेह नव्हता. अशाच पद्धतीने दररोज 25 ते 30 गंभीर रुग्णांबाबतचा अभ्यास केला जातो आणि त्यांच्या उपचारांमध्ये काय बदल हवे आहेत याविषयी सर्वांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि तसेच उपचार केले जातात. या सर्व प्रक्रियेमुळे रुग्ण दगावण्याची संभावना असणारा जो दर आहे तो 18.9 टक्क्यांहून 10.5 टक्के झाला आहे. म्हणजेच रुग्ण जगण्याचा दर वाढला. शिवाय, प्रत्येक कोरोना रुग्णामध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. 

बरेचसे कोरोना रुग्ण हार्ट अटॅक, पक्षाघात आणि पायाचा गँगरिन असलेले रुग्ण होते. त्यांच्याही उपचारांत बदल करुन त्यांना वाचवणे शक्य झाले. मार्च, एप्रिल आणि जून या महीन्यात साधारण ऑक्सिजन कमी होऊन , खोकला येऊन किंवा ताप येतो किंवा दम लागतो ही लक्षणे घेऊन रुग्ण येत होते. मात्र, आता हेच रूग्ण स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि गँगरिन, मधुमेह या आजारांचे येऊ लागले. त्यामुळे, रुग्णानुसार उपचार पद्धती बदलली आणि त्यात यश आल्याचे मत केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी व्यक्त केले आहे. 

ठाकरे सरकारमधल्या मंत्र्याला फडणवीस म्हणाले 'नया है वह'...

"कोविडच्या सर्व रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. फुप्फुस, ह्रदय, पाय आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. आणि त्यातून हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे, रुग्णांना रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन दिले जाते. ज्यात यश आले आहे. येणार्या सर्व गंभीर रुग्णांबाबत मल्टिस्पेशालिटी डाॅक्टरांची बैठक घेतली जाते. ज्यात रुग्णांच्या उपचार पद्धतीबाबत चर्चा करुन रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न केला जातो." असे  केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे. 

संपादन : अथर्व महांकाळ 

these type of covid patients has more risk of heart attack