esakal | स्टँडअप कॉमेडी शोसाठी कठोर सेन्सॉरशिप हवी; आमदार मनीषा कायंदे यांची मागणी..

बोलून बातमी शोधा

manisha kayande and standup

समाजमाध्यमांवर प्रसिद्धीचे वेड लागलेल्या तरुणाईला आपण कोणत्या व्यक्तिविषयी काय बोलत आहोत याचा ताळतंत्र राहिलेला नाही.

स्टँडअप कॉमेडी शोसाठी कठोर सेन्सॉरशिप हवी; आमदार मनीषा कायंदे यांची मागणी..
sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई: समाजमाध्यमांवर प्रसिद्धीचे वेड लागलेल्या तरुणाईला आपण कोणत्या व्यक्तिविषयी काय बोलत आहोत याचा ताळतंत्र राहिलेला नाही. त्यामुळे नुकताच एका कॉमेडियनने छत्रपती शिवाजी महाराजांचाही अपमान केला, अशा स्थितीत या स्टँडअप कॉमेडी शो वर बंदी घालावी किंवा त्यांच्यावर सेन्सॉरशिपची बंधने लादावीत, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियन अग्रीमा जोशुआ हिला अटक करावी अशी मागणी त्यांनी यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून केली आहे. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आज स्टॅन्ड अप कॉमेडी शो मध्ये अनेक थोर विचारवंत, महिला, राष्ट्रपुरुष वा अनेक वेळा एखाद्या समाजाची नाहक बदनामी होत असते. 

हेही वाचा: ठाकरे सरकारमधल्या मंत्र्याला फडणवीस म्हणाले 'नया है वह'... 

शॉर्टकट मार्गाने प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टँड अप कॉमेडीकडे आजचा तरुण वर्ग वळू लागला आहे. अगदी १६ -१७ वर्षांची मुले युट्युब फेसबुक व इतर समाजमाध्यमांच्या साह्याने प्रसिद्धीसाठी स्टँड अप कॉमेडीचा आसरा शोधू लागली आहेत. त्यामुळे या प्रकारावर कायदेशीर नियंत्रण हवे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

वास्तवात हे कॉमेडी शो करणाऱ्या विद्यार्थ्याचे वाचन व चिंतन खूपच कमी असते. त्यामुळे टाळ्या मिळवण्यासाठी ही मुले अपुऱ्या माहितीच्या आधारावर इतिहासातील घटनांवर विनोदनिर्मिती करतात व कळत नकळत यांच्याकडून राष्ट्रपुरुष तर कधी एखाद्या समाजाचा जाहीर अपमान होत असतो. 

कधी कधी तर रामायण व महाभारत ग्रंथातील व्यक्तींवर कॉमेडी होताना दिसते. आज मुंबई पुण्यातील अनेक खाजगी हॉटेल्समध्ये हे स्टॅन्ड अप कॉमेडी शो तिकीट घेऊन आयोजित केले जातात. परंतु त्यातील विनोदांवर कोणाचेच नियंत्रण नसते, त्यामुळे या कार्यक्रमांवर सेन्सॉरशिप लावणे गरजेचे झाले आहे, असे म्हणणे कायंदे यांनी मांडले आहे. 

हेही वाचा: राज्यातील ठाकरे सरकारबाबत संजय राऊत यांचं मोठं भाष्य; म्हणाले हे काही...

कोणतेही नाटक, चित्रपट आदींना सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. तोच नियम या स्टँडअप कॉमेडी शो साठी लागू करावा. कोणीही उठून कोणताही जाहीर कार्यक्रम करावा, अशी बेबंदशाही होऊ देऊ नये. या शो साठी देखील कायदे-नियम करावेत, अशी मागणीही कायंदे यांनी केली आहे.

 संपादन: अथर्व महांकाळ 

manisha kayande seeks censorship for standup comedy