दिलासादायक..! ठाणे जिल्ह्यातील 49 टक्के रुग्ण कोरोनामुक्त; अशी आहे शहरनिहाय आकडेवारी

दिलासादायक..! ठाणे जिल्ह्यातील 49 टक्के रुग्ण कोरोनामुक्तच; अशी आहे शहरनिहाय आकडेवारी
दिलासादायक..! ठाणे जिल्ह्यातील 49 टक्के रुग्ण कोरोनामुक्तच; अशी आहे शहरनिहाय आकडेवारी

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील अधिक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 17 हजार 823 रुग्णांपैकी 8 हजार 733 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याने बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 49 टक्के झाले आहे. तर, मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 3.34 टक्के आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, लहानापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच या आजाराची लागण होताना दिसून येत आहे. सध्या कोणतीही लस नसल्याने केवळ रोगप्रतिकार शक्तीच्या व योग्य उपचारांमुळेच कोरोनावर मात केली जाऊ शकते. दरम्यान ठाणे जिल्ह्यात दरदिवशी सुमारे 500 ते 700 नवीन रुग्णांची भर पडत आहे. मात्र कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बुधवार (ता.17) सायंकाळपर्यंत 17 हजार 823 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापैकी 49 टक्के म्हणजेच 8 हजार 733 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारी वरून दिसून येत आहे. तसेच 47.66 टक्के म्हणजेच 8 हजार 495 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच 3.34 टक्के म्हणजेच 595 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या आकडेवारीवरुन जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.
 

शहराचे नाव  एकुण करोना रुग्ण  कोरोनामुक्त रुग्ण  उपचार घेणारे रुग्ण
ठाणे  5606   2709 2721
नवी मुंबई   4189 2457 1063
कल्याण-डोंबिवली 2570 1176 1328 
मीरा-भाईंदर 1882 995 796
भिवंडी 687 181   455
उल्हासनगर 857  302 527
अंबरनाथ   846  321 504
बदलापूर    448 201  236
ठाणे ग्रामीण   739 391     325
एकूण      17823  8733  8495

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com