esakal | संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीने ५५९ कोटींचे नुकसान - सुभाष देसाई
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीने ५५९ कोटींचे नुकसान : सुभाष देसाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संभाजीनगर जिल्ह्यात सलग अतिवृष्टी व महापुरामुळे सुमारे ५५९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत ही माहिती सादर करून राज्य शासनाने तातडीने भरपाई देण्याची मागणी केली.

संभाजीनगर जिल्ह्यात यावर्षी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या दीडपट अधिक पाऊस झाला. यात चार लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तर १७ जणांचा बळी गेला. सुमारे १८६० घरांचे अंशतः नुकसान झाले. सुमारे ७४० किलोमीटरपर्यंत रस्त्याचे नुकसान झाले. १७ तलाव फुटले असून २१ कोल्हापुरी बंधारे वाहून गेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या, रस्ते, लघु-मध्यम प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने प्राथमिक पंचनामे करून तातडीने मदत केली असली तरी नुकसानीचा आकडा मोठा आहे. विविध विभागांच्या आकडेवारीनुसार ५५९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी नमूद केले,व विनाविलंब तरतूद करावी अशी मागणी केली.

हेही वाचा: रंगीबेरंगी मॅचिंग मास्‍कला पसंती; नोकरदार महिलांकडून मागणी

दरम्यान, केंद्र शासनाच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या निकषांनुसार पंचनामे केले जात असल्याचा मदत व पुनर्वसन सचिवांनी खुलासा केला श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी आपपल्या जिल्ह्यातील नुकसानीची माहिती सादर केली. राज्य तसेच केंद्र शासनाने आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी सर्वांनी आग्रह धरला.

हेही वाचा: बिर्याणी नव्हे यावेळी ट्राय करा हैदराबादी बैंगन

पालकमंत्र्याचा आज संभाजीनगर दौरा

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि. ७ रोजी संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील नुकसानीची पाहणी करणार आहेत. पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची आढावा घेणार आहेत.

loading image
go to top