esakal | झोपडपट्टीमधील 57 टक्के नागरिकांना कोविडची बाधा, मात्र औषधाविना केली आजारावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

झोपडपट्टीमधील 57 टक्के नागरिकांना कोविडची बाधा, मात्र औषधाविना केली आजारावर मात

या सर्वेक्षणाच्या पुढील टप्प्यात सामूहिक प्रतिरोधक शक्ती (हर्ड इम्युनिटी) म्हणजे नागरीकांमध्ये नैसर्गिक रित्या तयार झालेली रोगप्रतिकार शक्तीबाबत माहिती मिळू शकेल

झोपडपट्टीमधील 57 टक्के नागरिकांना कोविडची बाधा, मात्र औषधाविना केली आजारावर मात

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : शहरातील झोपडपट्ट्यांमधील 57 टक्के नागरीकांपर्यंत कोविड पोहचला असून कोणत्याही उपचाराविना नागरीकांनी कोविडवर मात केली आहे. शहरातील तीन प्रभागात झालेल्या सेरोलॉजीकल सर्वेक्षणात झोपडपट्ट्यांमधील 57 टक्के आणि बिगर झोपडपट्‌टी विभागातील 16 टक्के नागरीकांनी कोणतेही उपचार न घेता कोविडवर मात केली आहे. दहिसर, माटूंगा, सायन आणि चेंबूर या तीन प्रभागात झालेल्या सर्वेक्षणात झोपडपट्ट्यांमधील 57 टक्के नागरीकांमध्ये कोविड विरोधातील अँटीबॉडीज तयार झाली आहेत. तर महत्त्वाची बाब म्हणजे महिलांमध्ये कोविड विरोधात अधिक रोगप्रतिकारक शक्ती आहे. 

समाजातील कोविडचा संसर्ग जाणून घेण्यासाठी मुंबई महानगर पालिकेसह विविध संस्थांच्यावतीने या तीन विभागात सेरो सर्वेक्षण करण्यात आले. यात, प्रत्येक वयोगटातील 6 हजार 936 नागरीकांची चाचणी करण्यात आली. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी असे वर्गिकरण करुन हे सर्वेक्षण करण्यात आले असून झोपडपट्ट्यांमधील 57 टक्के नागरीकांमध्ये रक्तात अँटीबॉडीज तयार झाल्यया आहेत. तर, बिगर झोपडपट्‌टी परीसरात हे प्रमाण 16 टक्के एवढे आहे. महापालिकेसह निती आयोग, टाटा मुलभूत संशोधन संस्था या सर्वेक्षणात सहभागी झाले आहेत. 

मोठी बातमी - कोरोनासह मानसिक आजारांमध्ये वाढ; आर्थिक संकटामुळे अनेकजणांचा व्यसनांकडे वाढतोय कल..

यावरुन परीसरातील 57 टक्के नागरीकांना कोविडची बाधा झाली होती.त्यांच्यावर कोणतेही उपचार न होताही स्वत:च्या रोगप्रतिकारक शक्तीच्या आधारे कोविडवर मात केली आहे. असा अंदाज काढता येऊ शकतो. असे पालिकेच्या एका वैद्यकिय अधिकाऱ्याने सांगितले.यात काही प्रमाणात कोविडची लक्षणे असलेले रुग्णही असू शकतात.मात्र,जास्त व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणं नसल्याची शक्‍यता आहे.

संसर्ग मृत्यूदर 0.05 टक्के 

कोविड संसर्गापैकी लक्षणे नसलेले बाधितांची संख्या अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर झोपडपट्टीच्या परीसरातील दाटीवाटीची वस्ती तसेच सामुदायिक सुविधा यामुळे कोविडचा संसर्ग जास्त असल्याची शक्‍यता महापालिकेने वर्तवली. मुंबईतील मृत्यूदर सध्याच्या परीस्थीतीत 5 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. मात्र, या सर्वेक्षणाचा आधारावरुन महानगरपालिका 'संसर्ग मृत्यूदर ' हा 0.05 ते 0.10 टक्‍यांपेक्षा कमी असल्याचा दावा महापालिका करत आहे. 

मोठी बातमी - ...अन्यथा खाजगी वीज कंपन्यांना झटका देऊ; राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुढच्या टप्प्यात 

या सर्वेक्षणाच्या पुढील टप्प्यात सामूहिक प्रतिरोधक शक्ती (हर्ड इम्युनिटी) म्हणजे नागरीकांमध्ये नैसर्गिक रित्या तयार झालेली रोगप्रतिकार शक्तीबाबत माहिती मिळू शकेल. या संदर्भात अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास महत्वाचा ठरणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )  

57 percent of people staying in slums got covid infection but cured without any treatment

loading image