पावन धाम जैन उपाश्रयात 60 खाटांचे कोरोना केअर सेंटर; समाजाने दाखवला आदर्श

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 1 जून 2020

कोरोना लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कांदिवलीच्या पावनधाम जैन उपाश्रयाचे रुपांतर कोरोना रुग्णांच्या केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या किंवा अत्यंत कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर येथे उपचार केले जातील. 

मुंबई : कोरोना लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कांदिवलीच्या पावनधाम जैन उपाश्रयाचे रुपांतर कोरोना रुग्णांच्या केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या किंवा अत्यंत कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर येथे उपचार केले जातील. 

जिद्दीला सलाम! मुंबईतील तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात....

भाविकांच्या प्रार्थनेसाठी सध्या धर्मस्थळे बंद असताना या धर्मस्थळांचा उपोयग कोरोना लढ्यासाठी करण्याची समाजाची ही कृती इतरांना आदर्श घालून देणारी आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर मुंबई भाजप उपाध्यक्ष नीला सोनी यांनी व्यक्त केली. गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज यांच्या प्रेरणेने व या उपाश्रयाचे विश्वस्त घाटकोपरचे आमदार पराग शहा यांच्या पाठिंब्याने या शांतीस्थळाचे रुपांतर आता कोरोनाविरुद्धच्या युद्धस्थळात झाले आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी हे सेंटर उभारले आहे. 

मुंबईकरांनो सावधान ! ३ जूनला चक्रीवादळ महाराष्ट्र किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

हे केंद्र एकावेळी साठ कोरोना रुग्णांवर उपचार करू शकते. यात महापालिकेच्या नियमांनुसार आवश्यक तेवढे डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी असतील. येथे रुग्णांवर नेहमीचे औषधोपचार होतील, जरूर तर सलाईन-ऑक्सीजनही दिला जाईल. मात्र येथे आयसीयू तसेच व्हेंटीलेटर नसतील. रुग्णांना चहा-नाश्ता-जेवण आदी सर्व बाबी दिल्या जातील, असे पराग शहा यांनी सकाळ ला सांगितले. 

कसं होणार? 1 लाख नागरीकांसाठी फक्त 21 डॉक्‍टर; पुर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

आज सकाळी या केंद्राचे उद्घाटन झाले व सोमवारपासून ते सुरु होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निरामय फाऊंडेशनमार्फत हे केंद्र चालवले जाईल. येथे रुग्णांना दरदिवशी एक हजार रुपये आकारले जातील. मुंबईतील सरकारी तसेच खासगी कोरोना रुग्णालयांमधील खाटा संपत आल्याने आता अशा खासगी केंद्रांमुळे रुग्णांची व्यवस्था होऊ शकेल. अन्यत्र पंधरा ठिकाणी अशाच प्रकारे निरामय फाउंडेशनमार्फत अशी केंद्रे उभारली जातील. यात घाटकोपरची शाळा, जैन समाजाचे एक सभागृह आदींचा समावेश आहे, असेही शहा म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60-bed Corona Care Center at Pavandhan Jain ashram; The ideal to society