esakal | शाब्बास योद्ध्यांनो... मुंबईतील पोलिसांनी केली कोरोनावर यशस्वी मात
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai police

गेल्या दोन-अडीच महिन्यापासून कोरोनापासून मुंबईकरांचे संरक्षण करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस यांच्यासह महाराष्ट्र पोलिस दलातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहे.

शाब्बास योद्ध्यांनो... मुंबईतील पोलिसांनी केली कोरोनावर यशस्वी मात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : गेल्या दोन-अडीच महिन्यापासून कोरोनापासून मुंबईकरांचे संरक्षण करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस यांच्यासह महाराष्ट्र पोलिस दलातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते काम करत आहे. कोरोनाशी लढतानाच पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले. कोणत्याही संकटाशी दोन हात करणाऱ्या मुंबई पोलिसांतील आतापर्यंत 697 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.  त्यातील बहुसंख्य पोलिस कामावर पुन्हा रुजू झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा ः मुलाचे लग्न साधेपणाने करत कोव्हिड योद्ध्याने सहकाऱ्यांसाठी केला 'हा' उपक्रम 

मुंबई पोलिस दलातील 253 अधिकारी व 1518 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सुखद बाब म्हणून त्यातील 697 पोलिस कोरोनामुक्त होऊन झाले आहेत. त्यातील बहुसंख्य पोलिस पुन्हा सेवेत रुजू झाले आहे. कोरोनामुक्त झालेले बरेचसे पोलिस कोरोनाविरोधातील लढ्यातील त्यांचे अनुभव इतर कर्मचाऱ्यांना सांगत आहेत. तसेच  कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांनी अशा पोलिसांच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना धीर दिला जात आहे. मुंबईतील जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यातील पोलिस ठाण्यातील 45 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील सर्व पोलिसांनी कोरोनावर मात केली असून सुमारे 32 पोलिस पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.

वाचा ः सकारात्मक बातमी! कोरोना रुग्णांसाठी स्टीम थेरपी ठरतेय गुणकारी! वाचा बातमी सविस्तर

सध्या राज्यातील एक हजार 497 कोरोनाग्रस्त पोलिसांवर विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात  तसेच इतर ठिकाणी उपचार सुरु आहेत.तर सुमारे सात हजार पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनामुळे आतापयर्यंत राज्यात 33 पोलिसांना आपले जीव गमवावे लागले आहे. मुंबईतही 21 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय पथके दाखल करण्यात आली आहेत. मात्र या पथकातील जवान देखील कोरोनाच्या कचाट्यातुन सुटले नाहीत. आतापर्यंत 22 जवानाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.  याशिवाय मुंबईतील राज्य राखीव पोलिस दलाच्या 78 जवानांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

वाचा ः मुंबईतल्या कोरोना रुग्णांना दिलासा! महापौरांनी दिली 'ही' माहिती, वाचा...

राज्यातील दोन हजारांहून अधिक पोलिसांना कोरोना झाला आहे. तसेच संशयीत रुग्णाच्या संपर्कात आलेले सात हजार पोलिस विलगीकरणात आहेत. याशिवाय 55 वर्षावरील पोलिसांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. तसेच 50 वयोगटावरील पोलिसांना कमी जोखीमीचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी सध्या 10 हजार होमगार्ड, 1200 केंद्रीय सुरक्षा जवान देण्यात आले आहेत.

loading image
go to top