esakal | मुलाचे लग्न साधेपणाने करत कोव्हिड योद्ध्याने सहकाऱ्यांसाठी केला 'हा' उपक्रम 
sakal

बोलून बातमी शोधा

police saanitize

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन आहे. यामुळे मोठ्या स्वरुपात लग्न समारंभ करणे शक्य नाही. पोलिस हवालदार बागी हे जे. जे. मार्ग पोलिस स्टेशनमध्ये नियुक्त आहेत.

मुलाचे लग्न साधेपणाने करत कोव्हिड योद्ध्याने सहकाऱ्यांसाठी केला 'हा' उपक्रम 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन आहे. यामुळे मोठ्या स्वरुपात लग्न समारंभ करणे शक्य नाही. पोलिस हवालदार बागी हे जे. जे. मार्ग पोलिस स्टेशनमध्ये नियुक्त आहेत. त्यांचा मुलगा पवन बागी याचे लग्न ठरले होते. यामुळे पवनचा विवाह अत्यंत साधेपणाने आणि कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला. साधेपणाने लग्न केल्याने दोन्ही पक्षाच्या पैशांची बचत झाली. 

वाचा ः सकारात्मक बातमी! कोरोना रुग्णांसाठी स्टीम थेरपी ठरतेय गुणकारी! वाचा बातमी सविस्तर

दक्षिण मुंबईतील जे.जे मार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस हवालदाराने मुलाचे लग्न साधेपणाने करित लग्नाच्या पैशातून सहकाऱ्यांना सॅनिटायझर वाटप केले आहे. तर या कामामुळे या पोलिस कर्मचाऱ्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

वाचा ः मुंबईतल्या कोरोना रुग्णांना दिलासा! महापौरांनी दिली 'ही' माहिती, वाचा...

कोरोनावर सध्या औषध नाही. त्यामुळे काळजी घेणे जास्त आवश्यक आहे. जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी सुमारे 40 च्यावर पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील सर्व जण बरे झाले आहेत. त्यासाठी सतत हात स्वच्छ करत राहणे हा त्यावरील महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे बागी यांनी लग्नाच्या खर्चातून बचत झालेल्या पैशातून सुमारे 10 हजार रुपयाचे सॅनिटायझर विकत घेतले आणि ते आपल्या वरिष्ठ पोलीलि निरीक्षक यांना भेट दिले. हे सॅनिटायझर जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यातील सर्वांना वाटले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाचा ः वाचाल तर थक्क व्हाल! तब्बल इतक्या मुंबईकरांनी घेतला मद्याच्या 'होम डिलिव्हरी'चा लाभ

मुंबईतील जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यातील पोलिसांना मोठ्याप्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. या पोलिस ठाण्यातील 45 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील सर्व पोलिसांनी कोरोनावर मात केली असून सुमारे 32 पोलिस पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे बागी हवालदार यांनी सहकाऱ्यांची आरोग्याची काळजी करून उचललेला हा खारीचा वाटा इतर पोलिसांनाही प्रेरणादायी ठरेल.

loading image
go to top