esakal | तुरुगांतील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राज्यातील 700 कैद्यांना पॅरोल
sakal

बोलून बातमी शोधा

arrest

आर्थर रोड तुरुंगातील 158 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानतंर आता राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगांमधून सुमारे 700 कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे.

तुरुगांतील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राज्यातील 700 कैद्यांना पॅरोल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : आर्थर रोड तुरुंगातील 158 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानतंर आता राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगांमधून सुमारे 700 कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड तुरुंग लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतरही कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

महत्वाची बातमी : आजपासून सुरु झालेल्या स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक खास तुमच्यासाठी..

आर्थर रोड तुरुंगातील कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर राज्यात तीन दिवसांत 695 कैद्यांना पॅरोल देण्यात आला आहे. त्यांच्यात आर्थर रोड तुरुंगातील एकही कैद्याचा समावेश नाही. औरंगाबाद तुरुंगातून सर्वाधिक म्हणजे 210 कैद्यांना सोडण्यात आले. विशेष म्हणजे, सोमवारी एकाच दिवसात त्यांना पॅरोल देण्यात आला. देशाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या कैद्यांना एका दिवसात पॅरोल देण्यात आला आहे. त्यापाठोपाठ पैठण मध्यवर्ती तुरुंगातून 70, पुण्यातील येरवडा मध्यवर्ती तुरुंगातून 68, येरवडा खुल्या तुरुंगातून 53 कैद्यांची सुटका करण्यात आली. ठाणे तुरुंगातील 18, नवी मुंबईतील तळोजा तुरुंगातील 36 कैद्यांना पॅरोल देण्यात आला. राज्यातील सुमारे 11 हजार कैद्यांची सुटका करण्यात येणार होती; पण आता हा आकडा 18 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

मोठी बातमी सामनातून सरकारला थेट 'हा' सवाल, जनतेचा धीर सुटणार नाही याचीही काळजी घेण्याचा सल्ला

आर्थर रोडमध्ये विलगीकरण कक्ष
आर्थर रोड तुरुंगातील 158 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. फक्त 800 कैद्यांची क्षमता असूनही या तुरुंगात 2700 कैदी आहेत. त्यापैकी 400 कैद्यांना हमीपत्रावर सोडण्यात आले असून, 300 कैद्यांना नवी मुंबई येथील तळोजा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तुरुंगातील सर्कल 3 व 10 येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी सात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक नियमितपणे तुरुंगाला भेट देत आहे.

नक्की वाचा : मद्य खरेदीसाठी आता 'इ-टोकन'; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

तसेच राज्यातील 35 हजार कैद्यांपैकी 17 हजार कैद्यांना पॅरोल मिळणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यामध्ये 5000 कच्चे कैदी (अंडर ट्रायल), सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेले 3000 कैदी, सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेले 9000 कैद्यांचा समावेश आहे.

700 inmates in the state paroled after inmates in prisons contracted corona