कलानगर जंक्‍शनवरील उड्डाणपुलावर स्टील गर्डर प्रकल्पाचे 73 टक्के काम पूर्ण; 31 डिसेंबरपर्यंत सेवेत

तेजस वाघमारे
Sunday, 11 October 2020

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) वांद्रे पूर्व कलानगर जंक्‍शनवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोचले आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) वांद्रे पूर्व कलानगर जंक्‍शनवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोचले आहे. शनिवारी (ता. 10) मध्यरात्री कलानगर उड्डाणपुलावर स्टील गर्डर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रविवारी (ता. 11) सकाळी ते पूर्ण करण्यात आले. कलानगर उड्डाणपुलावर तिसरा गर्डर बसविण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे काम यंदाच्या 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 

दिवाळीनंतरही शाळा सुरू करणे अशक्‍यच; शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती - 

कलानगर जंक्‍शनला पश्‍चिम द्रुतगती महामार्ग व वांद्रे-कुर्ला जोडरस्त्यासह इतर तीन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होते. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे कोंडी दूर होणार आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे 10 मिनिटांची बचत होईल. आतापर्यंत प्रकल्पाचे 73 टक्के काम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव म्हणाले की, कलानगर जंक्‍शन उड्डाणपूल नियोजित वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित होणे अभिमानास्पद आहे. 

कुणाल कमराने घेतली संजय राऊत यांची मुलाखत; नेटकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता

आदित्य ठाकरेंची उपस्थिती 
गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प्रत्यक्ष जागेवर उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण टीमला प्रोत्साहित केले. एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांच्यासह उर्वरित अधिकारीही उपस्थित होते. 

असा आहे उड्डाणपूल 
1. मार्गिका ब ः वरळी-वांद्रे सागरी मार्गाकडून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी दोन पदरी मार्गिका. मार्गिकेची लांबी ः 714.40 मीटर. रुंदी ः 7.50 मीटर. 
2. मार्गिका क ः वांद्रे-कुर्ला संकुलाकडून वांद्रे-वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी दोन पदरी मार्गिका. मार्गिकेची लांबी ः 604.10 मीटर. रुंदी ः 7.50 मीटर. 
3. मार्गिका ड ः धारावी जंक्‍शनकडून वांद्रे-वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी. मार्गिका स्वतंत्र आणि दोन पदरी असून ती विना सिग्नल असेल. मार्गिकेची लांबी ः 310.10 मीटर. रुंदी ः 7.50 मीटर. 

  • - प्रकल्पाची एकूण किंमत 103.73 कोटी 
  • - कामाचा आदेश 2 जानेवारी 2017 रोजी काढण्यात आला 
  • - मे. सिम्प्लेक्‍स इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड ठेकेदार 
  • - उपठेकेदाराची नियुक्ती 29 जानेवारी 2020 रोजी करण्यात आली.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 73 per cent completion of steel girder project on flyover at Kalanagar junction In service until 31 December