esakal | भरारी पथकाची मोठी कामगिरी; साडे सात लाखांची बनावट दारू जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

manor

भरारी पथकाची मोठी कामगिरी; साडे सात लाखांची बनावट दारू जप्त

sakal_logo
By
नावेद शेख

मनोर : दमण बनावटीच्या दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी (ता.04) सायंकाळी तलासरी तालुक्यातील कोचाई बुरुड पाडा हद्दीत केलेल्या कारवाईत साडे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या परराज्यातील दारूची तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

हेही वाचा: दहिसरमध्ये आगळेवेगळे एनर्जीपार्क; अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे उभारणी

तलासरी तालुक्यातील कोचाई सूत्रकार रोडवरील बुरूडपाडा नदीच्या बाजूला सापळा रचण्यात आला होता. यावेळी एक मारुती कार संशयास्पद रित्या वाहतूक करताना दिसून आल्याने कार चालकाला थांबण्याचा इशार केला. परंतु, कार चालक भरधाव वेगाने पुढे गेला. कार बुरूडपाडा नदीच्या बाजूला कार सोडून कार चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. कारची तपासणी केली असता कारमध्ये परराज्यातील दमन बनावटीचा दारुचा साठा आढळून आला. कारसह साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कार चालकाच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 चे कलम 65 ( A ) ( E ) 98 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त कारची स्टेरिंग लॉक असल्याने क्रेनच्या मदतीने उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणण्यात आली. गुन्ह्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर करीत आहेत.

कारवाई पथकात उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक उदय शिंदे, पांडुरंग पडवळ, जवान एस.एस. पवार, आर.एम.राठोड, जवान बी.बी.कराड, ए.व्ही.पाटील आणि वाहन चालक पी.आर.निकुंभ सीमा तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.

loading image
go to top