esakal | मुंबई : लस दुष्परिणामांच्या भीतीतून 77 टक्के कर्करुग्णांचा लसीकरणाला नकार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : लस दुष्परिणामांच्या भीतीतून 77 टक्के कर्करुग्णांचा लसीकरणाला नकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 77 टक्के कर्करोगग्रस्त (Cancerous) रुग्णांमध्ये कोविड 19 लसीकरणाविषयी अजूनही साशंकता असल्याने त्यांनी लसीकरणाला (vaccination) नकार दिला आहे. कर्करोगग्रस्त दुष्परिणामांच्या भीतीमुळे लस घेण्यास इच्छुक नसल्याचा अहवाल टाटा मेमोरियल रुग्णालयाने मांडला आहे.

जवळपास 77% कर्करोग रुग्ण कोविड -19 लस घेण्यास संकोच करतात, कारण त्यांना दुष्परिणामांची भीती वाटते. शिवाय, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीमुळे कोविड लसीची वेळ पुढे ढकलली जात आहे. त्यासह माहितीचा अभाव आणि चुकीची माहिती असल्याने रुग्ण लस घेण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांच्या टीमने प्रश्नावली तयार केली होती. त्यातून टाटा मेमोरियल रुग्णालयातून हा अहवाल समोर आला आहे.

कर्करोग ग्रस्त रुग्णांना कोविड 19 आजाराचा सर्वात जास्त त्रास होतो. कारण, त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि लसीकरण त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे असते, असे कर्करोगशास्त्रज्ञ डॉ. श्रीपाद बनवली म्हणाले. डॉ. बनवली हे कर्करोग संशोधन, सांख्यिकी आणि प्रकाशित केलेल्या अभ्यासाच्या सह-लेखकांपैकी एक आहेत.

हेही वाचा: नाशिक : चार लाखांचा कोरोना रुग्णांना परतावा

हे सर्वेक्षण 7 मे ते 10 जून 2021 दरम्यान 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये करण्यात आले जे मोठ्या ट्यूमरने ग्रस्त होते.  अभ्यासात एकूण 435 रुग्णांचा समावेश करण्यात आला. यापैकी, 348 किंवा 80% रुग्णांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही, 15.2% रुग्णांना पहिला डोस मिळाला होता आणि फक्त 4.8% रुग्णांना दोन्ही डोस मिळाले होते. तर, 259 किंवा जवळपास 77% सर्वेक्षण केलेल्या रुग्णांमध्ये लसीबाबत सांशकता दिसून आली. सांशकतेचे एक कारण म्हणजे दुष्परिणामांची भीती आणि कर्करोगाच्या उपचारांचा परिणाम (38%) आणि माहितीचा अभाव (26.7%). तसेच, कोविड -19 लसीबाबत मार्गदर्शन आणि पूर्व सल्ल्याचा अभाव या संकोचात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, असेही अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: पनवेल : व्यापक वाहतूक योजनेसाठी सर्वेक्षण

डॉ. बनवली यांच्या मते, कोविड -19 लस केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीमध्ये व्यत्यय आणत नाही. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये लसीसंबंधित कोणतेही अतिरिक्त दुष्परिणाम आढळले नाहीत. या सर्वेक्षणाचे जून महिन्याच्या शेवटी विश्लेषण केले गेले. जेव्हा लसीकरण मोठ्या संख्येने सुरु झाले होते. पण, आजही ओपीडीत येणारे रुग्ण लसीकरण न झालेले आहेत. टाटा रुग्णालयाकडून त्यांना जागरुक केले जाते. कोविड 19 लसीकरण कार्यक्रमाबाबत आजही कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये सांशकता आहे.

हेही वाचा: BMC : कोविड लक्षणे असल्यास तातडीने चाचण्या करा

- मान शल्यचिकित्सक डॉ. पंकज चतुर्वेदी

लसीसाठी संकोच ही एक गुंतागुंतीची समस्या आहे आणि ती धोरणात्मक, वैयक्तिक आणि संस्थेच्या पातळीवर हाताळली पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांनी याबाबतचे लोकांना प्रशिक्षण आणि माहिती दिली पाहिजे असे डॉ. चतुर्वेदी यांनी सांगितले.

कर्करोग आणि कोविड -19 लसीकरण

  • कोविड -19 लस सक्रिय केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीवर असलेल्या कर्करोगग्रस्त रुग्णांना घेता येते.

  • कोविड -19 लस कर्करोगाच्या उपचारात अडथळा आणत नाही किंवा कोणतेही अतिरिक्त दुष्परिणाम नाही.

  • कर्करोग रुग्ण कोविड 19 मुळे असुरक्षित आहेत आणि त्यांच्यासाठी  लसीकरण महत्त्वपूर्ण आहे

loading image
go to top