80-year-old man romance scam Mumbai : मुंबईतील 80 वर्षीय वृद्धाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 9 कोटी रुपयांची गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वृद्धाने कधीही न भेटलेल्या तरुणींना २ वर्षात तब्बल 734 वेळा पैसे पाठवले. तसेच स्वत:जवळचे पैसे संपल्यानंतर मुलगा आणि सुनेकडूनही पैसे उधार घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्धाला मानसिक धक्का बसला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.