कोरोनामुळे जगभरातील 'इतके' विद्यार्थी शाळेबाहेर.....

कोरोनामुळे जगभरातील 'इतके' विद्यार्थी शाळेबाहेर.....

मुंबई: कोरोनाचा विषाणूंचा जगभरात फैलाव झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक राष्ट्रांनी स्वतःला लॉकडाऊन केलं आहे. सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी जिवनाश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता शाळा, कॉलेज, कार्यालये, सर्व बंद केली आहे. शाळा बंद झाल्यामुऴे जगभरात शाळा शिकणाऱ्या एकुण विद्यार्थ्यांपैकी अर्ध्या विद्यार्थ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या पोषण आहार, शिक्षण आणि सामाजिक अभिसरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे जवऴपास १०२ देशामध्ये आपताकालीन उपाय म्हणून सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत.त्यामुळे जगभरातील ८६ कोटी विद्यार्थी शाळेबाहेर आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था काही देशांनी सुरु केली आहे. चांगली आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पालकांना शाळाबाह्य शिकवण्या, ऑनलाईन वर्ग परवडतात. मात्र गरीब, कष्टकरी विद्यार्थ्याला घरी ऑनलाईन शिक्षण घेणे शक्‍य नाही. शिवाय पालक अशिक्षीत असल्यामुळे सर्वच पाल्यांना घरी शिकवणे शक्‍य नाही. 

कोरोनाचे संकट जास्त काळ सुरु राहील्यास शाळा अधिक काळासाठी बंद राहतील. त्याचे गरीब विद्यार्थ्यांवर आर्थिक, सामाजिक परिणाम होऊ शकतात. शिक्षण क्षेत्रात आर्थिक, सामाजिक दरी खूप मोठी आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना शाळा बंदचा जास्त फटका बसू शकतो. अमेरिकेतील न्युयॉर्क शहरात सर्व शाळा बंद ठेवल्या गेल्यात. मात्र शहरात सात लाख विद्यार्थ्यांना राहायला घर नाही. त्यांच्यापुढे कुठे राहायचे हा प्रश्न निर्माण झालाय. यापुर्वी या अनाथ विद्यार्थ्यांची शाळेतच राहण्याची आणि ३ वेळच्या जेवणाची सोय होत होती. 

भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये शाळेच्या माध्यमातून गरीब मुलांना मोफत पोषण आहार, सकस जेवण मिळते. मात्र शाळा बंद केल्यामुळे पोषण आहार गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आता कठीण झाले आहे. दारिद्र  रेषेखालच्या कुटुबांतील पालकांना कामावर जावं लागतं. मात्र शाळा बंद झाल्यामुळे मुलं घरी आहेत, त्यामुळे या मुलांची सामाजिक सुरक्षाही धोक्‍यात आली आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढू शकते अशी भिती शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे. 

  • कोरोनामुळे जगभरातील शाळा बंद आहेत. 
  • गरीब विद्यार्थ्यापुढच्या समस्या 
  • विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
  • अनेक पालक अशिक्षीत असल्याने पाल्यांना घऱी शिकवणे शक्‍य नाही. 
  • गरीब पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेक्‍लॉलॉजीचा अँक्‍सेस नाही. 
  • शाळा हेच सामाजिक अभिसरणाचे एकमेव माध्यम असल्यामुळे मुले सोशली डिसकनेक्‍ट होत आहेत. 
  • कष्टकरी पालकांना रोजगारासाठी बाहेर पडावे लागते. त्यामुळे घरी मुलांची आबाळ होते.
  • जास्त काळ शाळा बंद राहील्यास शाळा सोडणाऱ्या विद्यार्थांची संख्या वाढण्याची भिती आहे.

दरम्यान "दुष्काळी भागात सुट्टीच्या काळातही शालेय पोषण आहाराची व्यवस्था होती. त्या प्रकारे या काळात ग्रामीण, आदिवासी भागात पोषण आहार विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचवायला हवा. ग्रामिण भागातील कष्टकरी पालकांना मुल घरी असतांना त्यांचा अभ्यास कसा घ्यायचा हे माहिती नाही. त्यामुळे त्याबद्दल कार्यक्रम देण्याची गरज आहे." असं शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी म्हटलंय. 

86 crore students are missing their schools because of corona virus read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com