#BMC चा पाय आणखी खोलात! कामगाजावर येतोय ताण! वाचा काय घडलंय?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

  • अभियंत्यांच्या 900 जागा रिक्त 
  • महापालिकेच्या 24 विभाग कार्यालयांवर विपरित परिणाम 

मुंबई : मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या 900 जागा रिक्त असून, त्यामुळे 24 विभाग कार्यालयांतील कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे अभियंत्यांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी होत आहे. अभियंत्यांच्या जागा टप्प्याटप्प्याने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या आर्थिक मंदीमुळे महापालिकेच्या तिजोरीवर पडणारा भार लक्षात घेऊन भरती प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितेला फोनवरून धमक्या...

महापालिकेच्या अभियंत्यांवर सध्या इतर कामांचा भार टाकण्यात आला आहे. हा भार कमी करण्याची मागणी अभियंते करत आहेत. आम्हाला मूळ जबाबदारी नसलेली कामे करावी लागत असल्याने त्यातून होणाऱ्या चुका माथी मारल्या जातात, असे अभियंत्यांचे गाऱ्हाणे त्यामुळे रिक्त पदे भरल्यास अभियंतांवरील कामाचा ताण कमी होईल, असा विश्‍वास कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे. महापालिका प्रशासन टप्प्याटप्प्याने अभियंत्यांच्या जागा भरत असले, तरी अजूनही 900 रिक्त जागा आहेत. त्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. 

दिमाखदार कार्यक्रमात घरांच्या चाव्या दिल्या; घरांचा पत्ताच नाही...

आर्थिक मंदीमुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्याबाबत आयुक्त प्रवीण परदेशी यांनीही चिंता व्यक्त केली आहे. माजी आयुक्त अजोय मेहता यांनीही आर्थिक मंदीचे संकट असल्याचे सूचित केले होते. महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मोठी रक्कम खर्च होते. अभियंत्यांना दरवर्षी प्रत्येकी पाच लाख ते सहा लाख रुपये वेतनापोटी द्यावे लागता. जबाबदारी नसलेली कामे देऊन दोषी ठरवले जात असल्याचा अभियंत्यांचा आरोप आहे. त्यामुळे जबाबदारी नेमून देण्याची; तसेच रिक्त पदे भरण्याची मागणी अभियंते करत आहेत. 

 

अभियंत्यांच्या रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामांवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे कामगारांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. ही रिक्त पदे लवकर भरण्यात यावीत, अशी मागणी आम्ही सातत्याने महापालिका आयुक्तांकडे करत आहोत. 
- रमाकांत बने 
सरचिटणीस, दि म्युनिसिपल युनियन 

 900 Vacancies of Engineers in BMC 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 900 Vacancies of Engineers in BMC