गुडघ्‍यामध्ये काकडीएवढा मोठा खडा; खासगी रुग्णालयात प्रथमच शस्त्रक्रिया

७० वर्षीय रुग्‍णाच्‍या गुडघ्‍यामधून काढण्‍यात आलेला खडा जगातील दुसरा सर्वांत मोठा होता, असा दावा रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे.
गुडघ्‍यामध्ये काकडीएवढा मोठा खडा; खासगी रुग्णालयात प्रथमच शस्त्रक्रिया

मुंबई : मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्‍णाच्‍या गुडघ्‍यामधून काकडीच्‍या आकाराएवढा खडा काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ७० वर्षीय रुग्‍णाच्‍या गुडघ्‍यामधून काढण्‍यात आलेला खडा जगातील दुसरा सर्वांत मोठा होता, असा दावा रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे.

अमरावतीतील रोजंदारीवर काम करणारे लक्ष्‍मीकांत मधेकर यांना गेल्‍या वर्षापासून उजव्‍या गुडघ्‍यामध्‍ये वेदना होत होत्‍या. आठ ते दहा वर्षांपासून त्‍यांच्‍या गुडघ्‍याला सूजही येत होती. त्यामुळे चालताना, पायऱ्या चढताना आणि बसताना वा उठताना त्रास होत होता. असह्य वेदना होत असल्याने ते माहीममधील फोर्टिस सहयोगी एसएल रहेजा रुग्णालयात दाखल झाले. डॉक्‍टरांनी काही चाचण्‍या केल्या असता त्यांना अत्यंत दुर्मिळ असा ‘मल्टिपल जॉइंट सिनोवियल कोन्‍ड्रोमॅटोसिस’ आजार झाल्याचे निदान झाले.(A big stone in knee; First time surgery in a private hospital)

गुडघ्‍यामध्ये काकडीएवढा मोठा खडा; खासगी रुग्णालयात प्रथमच शस्त्रक्रिया
मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी

अस्थिरोगतज्ज्ञ आणि जॉइं‍ट रिप्‍लेसमेंट सर्जन डॉ. सिद्धार्थ एम. शाह यांनी सांगितले की, रुग्णाला गुडघ्‍याच्‍या सांध्‍यामध्‍ये गंभीर आजार होता. त्याला ‘मल्टिपल जॉइंट सिनोवियल कोन्‍ड्रोमॅटोसिस’ असे म्हणतात. अत्‍यंत दुर्मिळ असलेला हा आजार लाखात एखाद्याला होतो. या आजारात सामान्‍यत: ल्‍युब्रिकेटिंग फ्लूईड स्राव करणारे गुडघ्‍याच्‍या सांध्‍यामधील आतील अस्‍तर कुर्चाचे नोड्यूल्‍स तयार करतात. हे नोड्यूल्‍स तुटू शकतात आणि गुडघ्‍याचा भाग सैल करू शकतात. या रुग्‍णाला विविध जॉइंट सिनोवियल कोन्‍ड्रोमॅटोसिसचा त्रास होता, जो या आजाराचा अत्‍यंत दुर्मिळ व्‍हेरिएं‍ट आहे.

गुडघ्‍यामध्ये काकडीएवढा मोठा खडा; खासगी रुग्णालयात प्रथमच शस्त्रक्रिया
लॉकडाऊन काळात कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी वाढल्या

"रुग्णाच्‍या गुडघ्‍यामधील विविध खडे आकाराने खूप मोठे होते. यामधील सर्वांत मोठा खडा आकाराने १२ बाय ६ बाय ५.५ सेंटिमीटरचा होता आणि दोन तुकड्यांमध्‍ये काढणे गरजेचे होते. एकूण आम्‍ही रुग्‍णाच्‍या गुडघ्‍याच्‍या सांध्‍यामधून सर्जरी चार मोठे आणि डझनभर लहान खडे काढले. जगामध्‍ये गुडघ्‍यामधून काढण्‍यात आलेला हा दुसरा सर्वांत मोठा खडा आहे,'' असं अस्थिरोगतज्ञ डॉ. सिद्धार्थ एम. शाह यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com