Video: मित्रासोबतची मस्ती पडली महागात, कांदिवली रेल्वे स्टेशनवरील थरारक घटना

सध्या कांदिवली रेल्वे स्थानकावरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय.
kandivali railway station video
kandivali railway station video sakal
Updated on

मुंबई लोकल ट्रेन मुंबईकरांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. लोकल ट्रेनशिवाय मुंबईची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. दररोज लाखो लोक लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. पण याच लोकल ट्रेनचा प्रवास करताना अनेक अपघात घडतात. विशेषत: रेल्वे स्थानक परिसरात अपघात घडण्याच्या संख्येत बरीच वाढ दिसून येते. सध्या कांदिवली रेल्वे स्थानकावरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. (a cctv video of accident at kandivali railway station in mumbai goes viral)

kandivali railway station video
Video Viral: चप्पल घालून विजय प्रमोशनला गेला, रणवीरनं उडवली टर!

मित्रांसोबत मस्ती करणं एका मुलाला चांगलच महागात पडलं आहे. कांदिवली फलटावर दोघेजण मस्ती करत जात होते. पण अचानक मित्रांसोबत मस्ती करताना एका मुलाचा रेल्वे रुळावरुन तोल गेला आणि त्याला लोकल ट्रेननी धडक दिली. हा संपुर्ण प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

kandivali railway station video
Viral Tweet: 'घरी जाण्यासाठी सुद्धा...' IAS महिलेचं ते ट्विट चर्चेत

सध्या या घटनेचा सीसीटिव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

मुंबईत लोकल ट्रेनच्या बाबतीत अशा घटना नवीन नाहीय. या आधीही अशा अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकलमधून प्रवास करताना किंवा रेल्वे स्थानक परिसरात वावरताना सावधगिरीने राहणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com