बदलापूरातून अपहरण केलेल्या मुलीची हावड्यामधून सुटका; आरोपी जेरबंद

arrested
arrestedsakal
Updated on

उल्हासनगर : मोबाईल गेमच्या (Mobile game) माध्यमातून ओळख झालेल्या बदलापुरातील (Badlapur) अल्पवयीन मुलीचे (minor girl abduction) अपहरण करण्यात आले होते. तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या (crime branch) पोलिसांनी कोलकता हावडा आरपीएफ पोलिसांच्या मदतीने अटक (culprit arrested) केली आहे. बदलापुरातील अल्पवयीन मुलगी ८ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाली होती. पोलिसांना मुलीच्या मोबाईल आधारे ती एस. के. रोजन हा सतत संपर्कात असल्याचे निदर्शनास आले.

arrested
डिजिटायझेशन व पारदर्शकतेमुळे विमा घेणे सोपे झाले - राकेश जैन

पोलिसांनी रोजनचे मोबाईल ठिकाण शोधले असता त्यानुसार कल्याण रेल्वेस्थानक गाठले. सीसी टीव्ही फुटेजमध्ये एसके अल्पवयीन मुलीसोबत दिसला; पण तो स्थानकावर दिसत नसल्याने आरक्षणाचा तक्ता बघितला असता कर्मभूमी एक्स्प्रेसने पश्चिम बंगालकडे निघाल्याचे दिसले. पण त्याच्यासोबत मुलीऐवजी ५० वर्षीय महिलेचे आरक्षण होते. पोलिसांनी हावडा येथील डानकुणी रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना एसके व मुलीचा फोटो पाठवून त्यांची माहिती दिली. गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस ज्ञानेश्वर महाजन, संजय शेरमाळे यांना दुसऱ्या रेल्वेने हावड्यासाठी रवाना केले.

कर्मभूमी एक्स्प्रेस डानकुणी स्थानकावर पोहचताच आरपीएफ पोलिसांनी एसके रोजन व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आणि गुन्हे अन्वेषणच्या सुपूर्द केले. गुरवारी रात्री आरोपीला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेत आणण्यात आल्यावर मुलीला तिच्या पालकांकडे सोपवण्यात आले. आरोपीला बदलापूर पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com