esakal | अलिबागमधील समुद्रकिनाऱ्याला नवी झळाळी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अलिबागमधील समुद्रकिनाऱ्याला नवी झळाळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : येथील पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी अलिबाग पालिकेने समुद्र किनाऱ्याच्या परिसरात अनेक सोयी सुविधा दिल्या आहेत. आता किनारा परिसरात पेव्हर ब्लॉक (Paver block) वसवून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पालिका (Municipalty)सुमारे २९ लाख रुपयांचा निधी खर्च करणार आहे.

रो-रो सेवेसह अन्य सेवांमुळे मुंबई हे शहर अलिबागच्या अगदी जवळ येऊ लागले आहे. त्यामुळे येथील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सुटीच्या दिवशी हा समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजून जातो. वर्षाला सुमारे दोन लाख पर्यटक

भेट देतात. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात विजय मिळवण्यात मोलाची भूमिका बजावणारा टी ५५ रणगाडा गेल्या वर्षी किनाऱ्यावर बसवण्यात आला आहे. शहराचा नामफलक, आसन व्यवस्था आदी सुविधांसह संदेश देणारी चित्रे येथे काढण्यात आली आहेत.

हेही वाचा: आईच्या स्मरणार्थ उभारले गावासाठी प्रवेशद्वार

मुख्य प्रवेशद्वार ते सी व्यू हॉटेलपर्यंत पेव्हर ब्लॉक बसवण्यात येत आहे. यासाठी सुमारे १५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. किनाऱ्याजवळील महाराष्ट्र मेरिटाम वोडांचे कार्यालय ते शास्त्रीनगरपर्यंत पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी १० लाख रुपये खर्च होणार आहे.

हेही वाचा: ऐतिहासिक सामना अनिर्णित; स्मृती मानधना 'प्लेयर ऑफ द मॅच'

अधियाग हे ऐतिहासिक व पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. किनारी येणाऱ्या पर्यटकांबरोबरच नागरिकांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. किनारी आता पेव्हर ब्लॉकचे काम सुरू आहे. त्यामुळे किनाऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.

-प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबाग

loading image
go to top