
अखेर जीवघेणी पायपीट थांबली! सावर्डे गावात उभा राहिला लोखंडी पूल
ठाणे : मोखाडा तालुक्यातील सावर्डे गावातील आदिवासींना वैतरणा नदीपात्रावर लाकडाचा ओंडका टाकून जीव मुठीत धरून पायपीट करावी लागते असे, याचा त्रास येथील शेकडो नागरीक, विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांना होत असे, नुकतेच या नदीवर लोखंडी पुलाचे उद्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. ठाकरे यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली आहे.
त्यामुळे वैतरणा नदीपात्रावर लाकडाचा ओंडका टाकून या भागातील शेकडो नागरीक गेेल्या अनेक वर्षांपासून प्रवास करत होते. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुल बांधावा अशी मागणी केली जात होती, त्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी आदिवासींसाठीच्या या लोखंडी पुलाचे उद्घाटन केले. त्यानंतर आदिवासी बांधवांची पायपीट थांबणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत, मोखाडा तालुक्यातील सावर्डे गावातील आदिवासी बांधवांना दररोज जीव धोक्यात घालून लाकडी फळ्यावर नदी पार करावी लागत होती. याला आळा घालण्यासाठी, तसेच सर्वांसाठी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आज पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या सोबत लोखंडी पुलाचे उद्घाटन केले, अशी माहिती दिली आहे.