आतील खबर : मुख्यमंत्रिपदाऐवजी आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्रीपद?

वैदेही काणेकर
Thursday, 31 October 2019

  • महसूल किंवा नगरविकास खातं मिळण्याची चर्चा
  • मुख्यमंत्रिपदाऐवजी मंत्रिपदावर बोळवण?

ठाकरे, कुटुंबातून पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेले आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे असं काही सूत्रांकडून सांगितलं जातंय. महसूल किंवा नगरविकास खातं आदित्य ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आता वर्तवली जातेय. 

आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले  जातायत. त्यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निव़ड होण्याची शक्यता होती. मात्र, शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदेंची तर पक्ष प्रतोदपदी सुनिल प्रभू यांची निवड करण्यात आलीय.

काल मनसेचा नेता शरद पवारांच्या भेटीला; आज राष्ट्रवादीचा नेता राज ठाकरेंच्या भेटीला

शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल सोनिया गांधी यांचा 'मोठा' निर्णय..

आदित्य ठाकरेंना विधीमंडळातील कामकाजाचा अनुभव नाही, त्यामुळं एकनाथ शिंदे आणि सुनिल प्रभू यांच्या नेतृत्वात ते फ्लोअर मॅनेजमेंटचे धडे गिरवणार आहे. दुसरं म्हणजे एक आमदार म्हणून ते विधान परिषदेत हजर राहू शकत नाहीत. याउलट मंत्री म्हणून ते विधान सभा आणि विधान परिषद हजेरी लावू शकतात.

शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे. सेनेकडून आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजक्टही करण्यात येतंय. मात्र आता त्यांची कॅबिनेट मंत्री पदावर बोळवण होण्याची शक्यता आहे. खरंच असं झालं तर राजकीय पटलावर शिवसेनेचा हा मोठा पराभव  ठरेल.

Webtitle : aaditya thackeray will get cabinet minister post instead of CM post

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aaditya thackeray will get cabinet minister post instead of CM post