esakal | काल मनसेचा नेता शरद पवारांच्या भेटीला; आज राष्ट्रवादीचा नेता राज ठाकरेंच्या भेटीला
sakal

बोलून बातमी शोधा

MLA-Atul-Benke-MNS-Raj-Thackeray

जुन्नर विधानसभा मतदारसंघात मनसेने उमेदवार न देता राष्ट्रवादीचे उमेदवार बेनके यांना जाहीर पाठिंबा दिला होता.

काल मनसेचा नेता शरद पवारांच्या भेटीला; आज राष्ट्रवादीचा नेता राज ठाकरेंच्या भेटीला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : सध्या सत्ता स्थापनेसाठी भाजप-शिवसेनेत जोरदार हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असून मुख्यमंत्री आमचाच यावरून भाजप-सेनेमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. 

दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेतेही एकमेकांची भेट घेत आहेत. यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक कमालीची चर्चीली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसेचे नेते एकमेकांच्या भेटी घेत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुधवारी (ता.30) मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.

- संजय राऊत शरद पवार भेट, महाराष्ट्रातील नवी राजकीय समीकरणं?

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि जुन्नरचे नवनिर्वाचित आमदार अतुल बेनके यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघात मनसेने उमेदवार न देता राष्ट्रवादीचे उमेदवार बेनके यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे बेनके आभार व्यक्त करण्यासाठी कृष्णकुंजवर आले होते. या भेटीमागे दुसरा कोणताही राजकीय हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.  

- तडकाफडकी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते का गेलेत दिल्लीला?

आमदार बेनके यांनी शिवसेनेच्या शरद सोनावणे यांचा पराभव केल्यामुळे जुन्नरमधील मनसैनिक बेनकेंच्या विजयी रॅलीत सहभागी झाले होते. सोनावणे यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक मनसेच्या तिकीटावर लढविली होती. आणि ते निवडूनही आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत सेनेत प्रवेश केला होता. 

- पुणे-पंढरपूर प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!

दरम्यान, मनसेचे माहीम मतदारसंघातील उमेदवार संदीप देशपांडे यांनी कालच शरद पवार यांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवार यांनी दाखविलेल्या लढाऊ वृत्तीने आपण भारावून गेलो. त्यामुळे मी त्यांची भेट घेतल्याचे देशपांडे यांनी म्हटले होते. तसेच शरद पवार पुढील काही दिवसांत राज ठाकरेंशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.