esakal | आरेची जागा राखीव वनासाठी संरक्षित; अधिसूचनेस मंजुरी 
sakal

बोलून बातमी शोधा

aarey forest.j

आरे दुग्ध वसाहीच्या च्या ताब्यातील 328.90 हेक्‍टर व वन विभागाच्या ताब्यातील 40.46 हेक्‍टर जमीन ही भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 अन्वये राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस आज मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे आरे मधील जंगल वाढणार असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली. 

आरेची जागा राखीव वनासाठी संरक्षित; अधिसूचनेस मंजुरी 

sakal_logo
By
मिलिंद तांबे


मुंबई : आरे दुग्ध वसाहीच्या ताब्यातील 328.90 हेक्‍टर व वन विभागाच्या ताब्यातील 40.46 हेक्‍टर जमीन ही भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 अन्वये राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस आज मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे आरे मधील जंगल वाढणार असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली. 

राष्ट्रवादीनंतर काँग्रेसकडून रावसाहेब दानवे यांच्या टीकेचा समाचार


आरे दुग्ध वसाहत येथील जमीन ही राखीव वने म्हणून घोषित करावी, याबाबत सप्टेंबर मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज दुग्ध व्यवसाय विभाग व वन विभाग यांचेकडून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 ची प्राथमिक अधिसूचना व मनोदय घोषित करण्याची अधिसूचना काढण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार प्राथमिक अधिसूचना मंजुरी प्रदान केली आहे. त्यानंतर चौकशी होऊन भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 20 ची अंतिम अधिसूचना काढण्यात येईल असेही वनमंत्र्यांनी सांगितले. 
प्राथमिक अधिसूचनेनुसार वन जमाबंदी अधिकारी कोकण नवी मुंबई हे या जमिनीवरील हक्क, स्वरूप, व्याप्ती याबाबत चौकशी करतील तर त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांचेकडे अपील करता येईल, अशी माहितीही राठोड यांनी दिली. 

मुंबईत गंभीर रुग्णांचं प्रमाण ६ टक्के, रुग्णांसाठी फक्त 101 व्हेंटिलेटर उपलब्ध


मुंबईतील वाढते तापमान आणि प्रदुषण यावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबईतील असणारे जंगल राखणे आणि जंगल वाढवणे महत्वाचे आहे. या निर्णयामुळे मुंबईतील फुफ्फूसे अधिक बळकट होणार आहेत. सरकारने लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. 
अमृता भट्टाचारजी, आरे बचाव आंदोलक 

aarey land reserved for forest Notification approval sad Forest Minister Sanjay Rathore

(संपादन ः रोशन मोरे)