Green Toll : आरे रस्त्याला आता ग्रीन टोल

इको-सेन्सिटिव्ह झोनमधून प्रवास करणाऱ्यांकडून शुल्क आकारून 'ग्रीन टोल' लागू करण्यात येणार आहे.
Toll Naka
Toll NakaSakal

मुंबई - इको-सेन्सिटिव्ह झोनमधून प्रवास करणाऱ्यांकडून शुल्क आकारून 'ग्रीन टोल' लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगावला पवई आणि मरोळला जोडणाऱ्या रस्त्यावरून वाहनांची संख्या नियंत्रित राहिल राहिल असे आरे प्रशासनाने म्हटले आहे.

गोरेगावला पवई आणि मरोळला जोडणाऱ्या आरे कॉलनी मार्गावरून दररोज २५,००० हून अधिक वाहने जातात. गेल्या 2014 पूर्वी, आरे कॉलनी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुख्य रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनचालकांकडून टोल वसूल करत असे. दररोज सुमारे 3.5 लाख महसूल मिळत होता. या वाढत्या वाहनांमुळे या भागात प्रदुषणात भर पडत असून पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे आरे प्रशासनाचे म्हणणे आहे.

दररोज शेकडो वाहने मुख्य आरे कॉलनी रस्त्यावरून जातात, पर्यावरण हे संवेदनशील आहे. या भागात वाहनांमुळे प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे. हे प्रदुषण थांबिविण्यासाठी झोनमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या कमी करण्यासाठी ग्रीन टोल लागू करण्याचा प्रस्ताल ठेवत आहेत, अशी माहिती वनविभागाच्या अधिका-यांनी दिली.

किमान शुल्क आकारणे देखील स्वागतार्ह आहे. आरेमध्ये नोंदणीकृत दुचाकी वाहनांसाठी आदिवासींना मोफत पास उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. बाकीच्यांना जंगलातील रस्ते वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.

प्रदुषण कमी होईल

आरे जंगलातून जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वनविभाग आवश्यक पावले उचलत आहे, हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. प्रदूषणामुळे वन्यप्राण्यांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे, यापूर्वीही रस्ता ओलांडताना वन्यप्राण्यांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

वनक्षेत्राचा वापर कधीही रहदारीचा शॉर्टकट म्हणून केला जाऊ नये, आम्ही त्यांच्या योजनांचे स्वागत करतो. वनविभाग टोल आकारणार.आहे हे चांगले आहे. वाहनांवर नियंत्रण येईल, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते झोरू भाथेना यांनी दिली.

स्वागतार्ह पाऊल

ग्रीन टोल हे स्वागतार्ह पाऊल आहे. अलीकडे आरेपर्यंतचे रस्ते रहदारी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. किमान ग्रीन टोल आकारणे देखील स्वागत आहे. आदिवासींना दुचाकी वाहनांसाठी मोफत पास प्रदान केले जाऊ शकतात.

- डी स्टॅलिन, वनशक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com