
विरार : आषाढी निमित्ताने वारकऱ्यांची पाऊले सद्या वेगवेगळ्या पालख्या बरोबर पंढरपूरच्या दिशेने पडत आहेत. जे पांडुरंगाचे भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाहीत. अशांना दिंडी, पालखी सोहळा वसई मध्ये अनुभवता यावा यासाठी साहित्य जल्लोष प्रतिष्टान आणि यंगस्टार ट्रस्ट दरवर्षी आषाढी निमित्ताने अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करत असते. त्यावेळी काढण्यात येणारी दिंडी आणि पालखी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. यावर्षी हा सोहळा वसई येथील क्रीडामंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.