अस्मानी संकटावर मात करत शेतात भोपळा पिकवला पण आता...., शेतकरी हतबल

bhopala
bhopala
Updated on

पाली : कोरोनामुळे सुधागड तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्यावर चक्क रडण्याची वेळ आली आहे. अस्मानी संकटावर मात करत मोठ्या मेहनतीने शेतात 15 टन भोपळ्याचे उत्पादन घेऊनही बाजारपेठ नसल्याने सर्व माल पडून आहे. असंख्य भोपळे वेलींवर अक्षरशः सडत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

येथील राजेंद्र राऊत या शेतकऱ्याने आपल्या शेतात मोठ्या अपेक्षेने हंगामी पीक म्हणून भोपळ्याची लागवड केली होती. आजमितीस भोपळ्याचे भरघोस पीक आले आहे; मात्र बाजारपेठ नसल्याने 15 टन माल शेतात पडून आहे. काही भोपळा शेतात वेलीवर सडून जात आहे. परिणामी उघड्या डोळ्यासमोर लाखोंचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. प्रशासनाच्या मदतीची शेतकऱ्याला मोठी अपेक्षा आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य आणि देशभरात संचारबंदी, टाळेबंदी व कलम 144 लागू करण्यात आला आहे. परिणामी शेती व हंगामी पिकांना मोठा फटका बसला आहे. राजेंद्र राऊत या शेतकऱ्याने नव्याने प्रयोग करीत भोपळा पिकाची लागवड केली. 15 टन इतके भरघोस उत्पादन होऊनही माल जागीच पडून असल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. शेतकरी राजेंद्र राऊत यांनी सुधागड तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे आपली कैफीयत मांडून सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी स्वतः राऊत यांच्या शेतीवर जाऊन भोपळा उत्पादनाची पाहणी केली. 

शेतकऱ्यांच्या फळे, पालेभाज्या व पिकांचे नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांना आवश्यक ती बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील आहे.
- दिलीप रायन्नावार, तहसीलदार

 About 15 tons of pumpkins fell in the field Farmers in Wawloli in crisis

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com