AC Local: वाढत्या एसी लोकलमुळे सामान्य लोकलच्या फेऱ्यांवर परिणाम; सर्वसामांन्यांचे हाल!

AC Local
AC LocalSakal

AC Local: मध्य रेल्वेवर १०; तर पश्चिम रेल्वे मार्गावर १७ अशा २७ एसी लोकल फेऱ्या सोमवार (ता. ६) पासून वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे; परंतु या नवीन एसी लोकलमुळे साध्या लोकलच्या फेऱ्यांवर गदा आली आहे.

AC Local
AC Local : एसी लोकलचे प्रवासी दुप्पट! तीन महिन्यात एसी लोकलमध्ये ९ हजार फुकटे प्रवासी

एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर, मध्य रेल्वेवरील एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मध्य-पश्चिम रेल्वे मार्गावर एसी गाड्यांची वाढती लोकप्रियता आणि त्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेवर १० आणि पश्चिम रेल्वेवर १७ सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून त्याऐवजी एसी गाड्या सोमवारपासून चालवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या साध्या लोकल फेऱ्यांवर गदा आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एसी लोकलचे दर न परवडणारे

एसी लोकलचे तिकीट दर जास्त असल्याने सुमारे ९५ टक्के प्रवासी साध्या लोकलने प्रवास करतात; परंतु एसी लोकलची संख्या वाढवण्यासाठी साध्या लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात येतात. त्यामुळे साध्या लोकलची संख्या कमी होते. त्यातच एसी लोकल सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या काळात चालवण्यात येतात. त्यावेळी उपनगरीय रेल्वे मार्गांवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. याचवेळी साध्या लोकल उपलब्ध नसल्याने रेल्वे स्थानकातील गर्दी वाढते.

प्रवाशांचा विरोध

एसी लोकलनंतर स्थानकात येणाऱ्या साध्या लोकलला प्रवाशांची सर्वाधिक गर्दी होते. एसी लोकल फेऱ्यांना प्रवाशांचा विरोध नाही. एसी लोकल प्रवासी सेवेत दाखल करताना नव्या स्वरूपात आणाव्यात. साध्या लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी एसी लोकल आणल्या जातात, त्यास प्रवाशांचा विरोध आहे.

AC Local
AC Local : एसी लोकलचे प्रवासी दुप्पट! तीन महिन्यात एसी लोकलमध्ये ९ हजार फुकटे प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com