प्रजासत्ताकदिनापासून 'या' मार्गांवर धावणार एसी लोकल

प्रजासत्ताकदिनी 'या' मार्गांवर धावणार एसी लोकल
प्रजासत्ताकदिनी 'या' मार्गांवर धावणार एसी लोकल

नवी मुंबई : मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित लोकल जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी गुरुवारी (ता. ९) दिली. ही लोकल ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेल मार्गावर धावणार आहे.

मध्य रेल्वेवरील पुलांच्या उंचीमुळे पहिली एसी लोकल २०१७ मध्ये पश्‍चिम रेल्वेला देण्यात आली. त्यानंतर एसी लोकलच्या उंचीवर तोडगा काढल्यानंतर कुर्ला कारशेडमध्ये ७ डिसेंबर २०१९ ला पहिली एसी लोकल दाखल झाली आहे. तिच्यात काही तांत्रिक बदल करून चाचण्या घेण्यात आल्या. एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याकरिता तारीख निश्‍चित करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. येत्या आठवड्यात शेवटची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर १० दिवसांत एसी लोकल सुरू होईल, असे मित्तल यांनी सांगितले. ही लोकल ताशी किमान ११० कि.मी. वेगाने धावू शकते. त्यात आसनांची संख्या १०२८ असून उभ्याने ५९३६ जण प्रवास करू शकतात. लोकलचे दरवाजे स्वयंचलित आहेत. त्याचे नियंत्रण मोटरमन आणि गार्डकडे असून डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणाही पुरवण्यात आली आहे. 

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा दरवाजा लवकर बंद न झाल्यास तत्काळ मदतीसाठी मध्य रेल्वेने १०० कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत चेन्नईतील आयसीएफ कारखान्यात ही लोकल तयार करण्यात आली असून त्यासाठी सुमारे ५० कोटींचा खर्च आला आहे. भारत हेवी इलेक्‍ट्रिकल लिमिटेड (भेल)ने त्यासाठी वीजयंत्रणा पुरवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com