

Bombay HC Stresses Right to Drinking Water, Questions Government’s Approach
Sakal
मुंबई : ‘‘पिण्यायोग्य पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली तरीही मेळघाट परिसरातील नागरिकांना त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, ’’ अशा शब्दांत सोमवारी (ता. २२) उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले. त्यासंदर्भात तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत माहिती मंगळवारी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.