
उस्मानाबादमध्ये विविध उपक्रम; ‘थिंक महाराष्ट्र’तर्फे माहिती संकलन
साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथालीची सृजन ग्रंथप्रसार यात्रा
मुंबई : ‘थिंक महाराष्ट्र’ व ग्रंथाली यांच्या वतीने ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक कार्यक्रम व जिल्ह्यातील व्यक्ती-संस्था यांनी केलेल्या कामांची नोंद आदींचा या सृजन ग्रंथप्रसार यात्रेत समावेश आहे.
मोठी बातमी मंत्रिमंडळ खातेवाटप : कुणाला कोणतं खातं? वाचा पहिली यादी
ग्रंथाली प्रकाशन संस्थेच्या वतीने उस्मानाबाद येथे चार व पाच जानेवारीला सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत ग्रंथप्रदर्शन भरवले जाईल. ५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता अॅड. राज कुलकर्णी यांच्या ‘दक्षिणेची मथुरा तेर’, ‘वेताळ पंचविशी’, ‘आठवडी बाजार आणि समाज जीवन’ या पुस्तकांचे प्रकाशन होईल. उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला सोलापूर पुरातत्त्व शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया शहापूरकर, ‘थिंक महाराष्ट्र’ व ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर उपस्थित राहतील.
धक्कादायक मोबाईलमध्ये महिलेचे केले विवस्त्र चित्रीकरण अऩ्....
‘थिंक महाराष्ट्र’चे कार्यकर्ते नितेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महाविद्यालये-संस्थांना भेटी देऊन ऑडीओ-व्हिडीओ व लिखित स्वरूपात विविध उपक्रमांच्या माहितीचे संकलन करणार आहेत. या सृजन ग्रंथप्रसार यात्रेला उस्मानाबादमधील ग्रंथालीचे कार्यकर्ते रवींद्र केसकर, सुनील बडुरकर, अॅड. राज कुलकर्णी यांनी सहकार्य केले आहे. यानिमित्ताने ग्रंथालीच्या प्रत्येकी १५० पुस्तकांचे दोन संच वाचक व वाचनालयांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रंथालीच्या पुस्तकावर वाचकांना ४० टक्के सवलत मिळणार आहे.
महत्वाची बातमी मोकाट कुत्र्याचा हौदोस; 10 विद्यार्थ्यांवर केला हल्ला
रसिकांसाठी ‘गझलधारा’
ग्रंथप्रसार यात्रेचा मुक्काम उमरगा व कळंब येथे होईल. या ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाबरोबर प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर सानेकर आणि गोविंद नाईक यांचा ‘गझलधारा’ (मराठी गझलांची मैफल) हा कार्यक्रम होणार आहे.
Web Title: Acording Sahitya Sammelan Books Awareness Rally Granthali
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..