मुंबईसह राज्यात ड्रग्सविरोधात वर्षभरात सर्वाधिक कारवाया; गांजाच्या गुन्ह्यांत 17 टक्‍क्‍यांनी वाढ

मुंबईसह राज्यात ड्रग्सविरोधात वर्षभरात सर्वाधिक कारवाया; गांजाच्या गुन्ह्यांत 17 टक्‍क्‍यांनी वाढ
मुंबईसह राज्यात ड्रग्सविरोधात वर्षभरात सर्वाधिक कारवाया; गांजाच्या गुन्ह्यांत 17 टक्‍क्‍यांनी वाढ

मुंबई : सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी मुंबईतील ड्रग्स तस्करांविरोधात केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मोहीम उघडली असून आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षभराची आकडेवारी पाहता मुंबईसह राज्यभरात ड्रग्सविरोधात सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहे. परिणामी, मुंबईसह राज्यात अमली पदार्थांप्रकरणी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 

राज्य गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) 2019 च्या आकडेवारीनुसार मुंबईत ड्रग्ससंबंधित 12 हजार 418 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात विशेष आणि स्थानिक कायद्यांतर्गत (एसएलएल) दाखल गुन्ह्यांचाही समावेश आहे. याशिवाय राज्यात 14 हजार 158 गुन्ह्यांची नोंद करण्यात झाली आहे. त्यात 13 हजार 199 गुन्हे सेवनासाठी ड्रग्स बाळगल्याप्रकरणी होते; तर 959 गुन्हे तस्करीसाठी ड्रग्स बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आले होते. आयपीसीच्या कलमांसह एसएलएल गुन्ह्यांचाही त्यात समावेश आहे. महाराष्ट्रापाठोपाठ पंजाब (11536) व उत्तर प्रदेशात (10198) ड्रग्सप्रकरणी गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2018 च्या तुलनेत गांजाबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये 2019 मध्ये 17 टक्के गुन्ह्यांची वाढ झाली आहे. देशभरातून तीन लाख 42 हजार 45 किलो गांजा, चार हजार 488 किलो ओपियम, तीन हजार 572 किलो हशीश, 686 किलो एफिड्रीन जप्त करण्यात आले आहे. 

ड्रग्सप्रकरणी राज्यनिहाय दाखल गुन्हे 
महाराष्ट्र     14 हजार 158  यात (मुंबई 12 हजार 418) 
पंजाब         11 हजार 536 
उत्तर प्रदेश  10 हजार 198 

मद्यप्रकरणी राज्यनिहाय दाखल गुन्हे 
गुजरात             दोन लाख 42 हजार 004 
तामिळनाडू        एक लाख 55 हजार 610 

मद्य गुन्ह्यांत गुजरात अग्रेसर 
अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत देशात 72 हजार 779 गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात 45 हजार 503 एसएलएलचा समावेश आहे; तर देशात तस्करीप्रकरणी 27 हजार 276 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मद्य बाळगल्याप्रकरणी गुजरातमध्ये सर्वाधिक म्हणजे दोन लाख 42 हजार 4 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडूमध्ये एक लाख 55 हजार 610 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एनसीबीसह संबंधित यंत्रणांनी देशभरात 57 हजार 867 गुन्ह्यांची नोंद केली. त्यात 74 हजार 620 व्यक्तींना अटक करण्यात आली असून, यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. 
---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com