लॉकडाउन तोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा! मुंबईत दोन दिवसांत सहा हजार वाहनांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 21 मे 2020

  • लॉकडाऊन तोडून रस्त्यांवर 
  • दोन दिवसांत सहा हजार वाहनांवर कारवाई

मुंबई : लॉकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर झाल्यानंतर अनेक नागरिक कार व दुचाकीवरून रस्त्यांवर फिरत होते. या प्रकारांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत 6000 वाहनचालकांवर कारवाई केली.
सोमवारपासून मुंबईतील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ अंशत: वाढली. पूर्व व

1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वे ट्रेन्सचं बुकिंग सुरु, 'हे' आहेत नियम, 'असं' करा तिकीट बुक

पश्चिम द्रुतगती मार्गांवर कार व दुचाकींची गर्दी झाली. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी पोलिसही ठिकठिकाणी वाहनांची तपासणी व कारवाई करत आहेत. वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल 6000 वाहने जप्त केली. पश्चिम द्रुतगती मार्ग, अंधेरी व विलेपार्ले उड्डाणपूल आदी परिसरांत वाहनांची संख्या तुलनेने अधिक होती. 

पोलिसांनीही अनेक ठिकाणी नाकाबंदी केली असून जीवनावश्यक सेवेच्या पासची तपासणी केली जात आहे. अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या अनेक वाहनचालकांकडे पास नसल्याचे आढळले. दुचाकीवरून एकाहून अधिक जण जात असल्यासही कारवाई केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी मंगळवारी 4294 वाहनांवर कारवाई केली. त्यात1700 रिक्षा, 1150 दुचाकी आणि 1057 चारचाकी वाहनांचा समावेश होता. बुधवारी आणखी 2000 वाहनांवर कारवाई करण्यात आली. 

कोरोनाला रोखण्यासाठी 50-30 चा फॉर्म्युला? वैज्ञानिकांनी सुचवला हा पर्याय

लॉकडाऊनमध्ये जारी चालाने 
विनाहेल्मेट दुचाकी चालवणे : 73 हजार 735
पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन : 36 हजार 248
परवाना सादर न करणे : 11,611
विनापरवाना वाहन चालवणे : 6354
एकूण : 2,09,018 
दंड : 9,43,46,200 रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against those who break lockdown! Action on 6,000 vehicles in Mumbai in two days