खबरदार! अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्रास दिल्यास कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास दिल्यास त्या सोसायटीतील संबधितांवर साथरोग प्रतिबंधक कायदा 1897,आपत्ती व्यवस्थापन कायदा - 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 च्या अधिनियमानुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

ठाणे : कोरोनाबाधित व संशयितांसह त्यांच्या कुटुबियांना मानसिक छळाला सामोरे जावे लागत असल्याच्या काही घटना समोर आल्या असून आता अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या आरोग्य विभाग व पोलीस दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना  राहत असलेल्या सोसायटीतील रहिवाशी व पदाधिकाऱ्याकडुन दुजाभावाची वागणुक देऊन त्रास दिला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.

नक्की वाचा : ते हळूच झुडपात गेले आणि अनेक दिवसांचं पेंडिंग काम एकदाचं करून आले...  

या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांना अशा प्रकारे वर्तन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून याबाबतचे समजपत्र सर्व गृहसंकुले व सोसायट्यांना तातडीने देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.

हे ही वाचा : घरातच सलून अन् हातात कात्री, लॉकडाऊन दरम्यान लोकांनी घरीच कापले केस

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास दिल्यास त्या सोसायटीतील संबधितांवर साथरोग प्रतिबंधक कायदा 1897,आपत्ती व्यवस्थापन कायदा - 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 च्या अधिनियमानुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Action in case of harassment of essential service personnel

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action in case of harassment of essential service personnel