esakal | नवरात्रोत्सवात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नवरात्रोत्सवात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : नवरात्रोत्सवाची रायगड जिल्ह्यात लगबग सुरू झाली आहे; मात्र हा उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, हा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी नियमावली करण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक अशोक दुध यांनी 'सकाळ'ला सांगितले.

हेही वाचा: नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; देवीच्या मूर्ती महागल्या

मूर्ती आणि घटस्थापनेसाठी मंडप उभारण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. खासगी व सार्वजनिक मंडप उभारताना कोणतीही परवानगी घेतली जात नाही. या प्रकारामुळे अनेक वेळा वाद होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असते. सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार नवरात्रोत्सव साजरा करण्याचे आवाहन दुधे यांनी केले आहे.

loading image
go to top