माणगावात कोरोनावर मात करण्यासाठी 'ही' यंत्रणा येणार अॅक्शनमध्ये

corona
corona

माणगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगांव उपविभागात प्रत्येक गावामध्ये कोव्हिड वॉरिअर ग्रुप तयार केले आहेत. त्यामध्ये गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, सरपंच, ग्राम पंचायत सदस्यांचा समावेश असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी दिली.

हे कर्मचारी व कार्यकर्ते परगावाहून आलेली माणसे शोधून त्याची माहिती सरकारी यंत्रणेला देतील. कोरोना संशयास्पद आढळल्यास त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याची माहिती रुग्णालयात कळविले जाईल. घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करून तो अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात येईल. तसेच रेशन धान्य दुकानातील धान्य गरीबांना पोहचते किंवा नाही याकडे लक्ष देणार आहेत. 

धान्य रास्त भाव दुकानदाराकडून संबंधित पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोच होणाऱ्या धान्य वाटपामध्ये पारदर्शीपणा येण्यासाठी उपविभागात माणगांव व तळा तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानांची तपासणी करण्यासाठी माणगांव उपविभागात अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

सोशिअल डिस्टन्स राखूनच वाटप
रेशनिंग दुकानदार हे अन्नधान्याचे वाटप संबंधित कार्डधारकांना कशा प्रकारे करीत आहेत. याबाबत तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील रास्त भाव धान्य दुकांनदारांवर करडी नजर ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच रेशनिंग दुकानदारांना अन्नधान्याचे वाटप करताना सोशिअल डिस्टन्स राखूनच अन्नधान्याचे वाटप करण्याबाबत कळविले आहे अशी माहिती प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी दिली.

 In action this mechanism will come out to defeat Corona in Managhat

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com