esakal | बेलापूरमध्ये रेस्टॉरंटवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बेलापूरमध्ये रेस्टॉरंटवर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : लॉकडाऊनच्या (Lockdown) नियमांचे उल्लंघन करीत सुरू असलेल्या सीबीडी सेक्टर-१५ मधील स्पोर्टिकास या रेस्टॉरंटवर नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिकेच्या दक्षता पथकाने आज सायंकाळी पोलिसांच्या मदतीने कारवाई करून रेस्टॉरंटला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. या रेस्टॉरंटमध्ये आज मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते.

हेही वाचा: खासगी रुग्णालय करणार मोफत लसीकरण; रहिवाशांसाठी सीएसआर निधीचा वापर

मास्कचा वापर न करता तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी केल्याची माहिती महापालिकेच्या दक्षता पथकाला मिळाली. त्यानंतर महापालिकेच्य दक्षता पथकाने रेस्टॉरंटमध्ये पाहणी केली. या वेळी नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसल्याने ही कारवाई करण्यात आली. तरुण-तरुणींना बाहेर काढण्यात आले.

loading image
go to top