निकृष्ट दर्जाचे धान्य देणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा; मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क 
Friday, 18 September 2020

मुंबई व ठाण्यातील काही अधिकृत शिधावाटप दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे धान्य मिळाल्याच्या तक्रारींसंदर्भात कठोर कारवाई करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या.

मुंबई : मुंबई व ठाण्यातील काही अधिकृत शिधावाटप दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे धान्य मिळाल्याच्या तक्रारींसंदर्भात कठोर कारवाई करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार नुकतीच दोन दुकानचालकांवर कारवाई करण्यात आली. 

बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ लांबणीवर; आंबेडकरी नेत्यांना निमंत्रणच नाही

मालवणी परिसरातील एका दुकानातून 514 किलो तांदूळ, दोन हजार 838 किलो गहू, 116 किलो तूरडाळ आणि 112 किलो चणाडाळ असा साठा जप्त करण्यात आला. या धान्याची किंमत एक लाख चार हजार 287 रुपये आहे. याप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 16) गुन्हा नोंदवला आहे. तर घाटकोपरमधील एका दुकानाच्या तपासणीनंतर 487 किलो तांदूळ, नऊ किलो गहू आणि चार किलो चणाडाळ असे 18 हजार 672 रुपयांचे धान्य जप्त केले. याप्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात मागील आठवड्यात (ता. 11) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. दुकानांमधील धान्याचा दर्जा उत्तम असावा, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. तरीही खराब धान्य दिल्याच्या तक्रारी येत असल्याने भुजबळ यांनी हे पाऊल उचलले आहे. 

कंपन्यांच्या कर्ज चक्रव्युहामधून महिलांना बाहेर काढण्यासाठी राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

येथे तक्रार नोंदवा
कोणत्याही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत असल्यास कार्यालयाच्या हेल्पलाईनवर 022-22852814; तसेच ई-मेल dycor.ho-mum@gov.in यावर संपर्क साधल्यास कारवाई केली जाईल, असे शिधावाटप नियंत्रक व संचालक नागरी पुरवठा संचालक यांनी कळवले आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action will be taken against shopkeepers who provide substandard foodgrains said chagan bhujabal