सोनू ने घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट, सोनूला राज्यपाल म्हणालेत...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

अभिनेता सोनू सूदने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राजभवन येथे त्यांची ही भेट झाली.

मुंबई : अभिनेता सोनू सूदने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राजभवन येथे त्यांची ही भेट झाली. मुंबईतील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहचवण्याची व्यवस्था आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था केल्याची माहिती सोनूने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली होती. यावर राज्यपाल यांनी फोनवर सोनूचे कौतुक केले होते. शिवाय सोनूला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे देखील त्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे त्यांनी आज सोनू ची प्रत्यक्षात भेट घेतली आहे. 

सोनूचं राज्यपाल यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर राज्यपाल यांच्या ट्विटर अकाऊंट वरून याची अधिकृत माहिती देण्यात आली. त्यावर सोनूने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. राज्यपालांनी केलेल्या कौतुकाने सोनला काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले.

मोठी बातमी - मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता महापालिकेचा मोठा निर्णय, युद्धपातळीवर सुरु केलंय काम....

सोनू ट्विट करत म्हणाला की, "सर तुमचे खूप आभार. तुम्ही केलेल्या कौतुकाने मला अधिक काम करण्याची प्रेरणा मिळाली. जिथपर्यंत स्थलांतरित बंधू भगिनी त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचत नाही तिथंपर्यंत मी त्यांची मदत करत राहीन." 

या कठीण काळात सोनू करत असलेल्या कार्याचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले आहे. यातच बॉलिवूड कलाकरांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सोनूचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोनूला "चित्रपटातील खलनायक मात्र खऱ्या आयुष्यात हिरो" असे संबोधले होते. शिवाय भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी सोनू करत असलेल्या कार्याचे आभार मानले. 

मोठी बातमी - बाप रे! मुंबईत बसून पाकिस्तानला देत होता भारतीय लष्कराची माहिती: संशयिताला गुप्तचर विभागानं घेतलं ताब्यात...  

लॉकडाऊन सुरू झाले आणि परप्रांतीय मजुरांनी त्यांच्या गावी जाण्यासाठी स्टेशन्स आणि बसस्टँडवर गर्दी करू लागले. घरी जाण्याची ओढ असलेल्या या मजुरांसाठी सोनू देवासारखा धावत आला. त्याने त्या सर्वांसाठी बसेसची व्यवस्था केली. त्यानंतर पासून शेवटचा मजुर त्याच्या घरी पोहचेपर्यंत तो शांत बसणार नाही अशी जणू शपथच घेतली. ज्या मजुरांना गरज आहे त्यांच्याशी सोनू सोशल मीडियावरद्वारे संपर्कात आहे. त्यामुळे सोनू चित्रपटांमध्ये जरी खलनायक असला तरीही खऱ्या आयुष्यात तो मजुरांसाठी देवच बनला आहे.

actor and masiha of migrant workers sonu sood visits raj bhavan and met bhagatsingh koshyari


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor and masiha of migrant workers sonu sood visits raj bhavan and met bhagatsingh koshyari