Mumbai News : मुंबई ते पुणे आणि दानापूर दरम्यान अतिरिक्त चार विशेष गाड्या चालविणार!

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१४८१ ०१४८२ दानापूर - पुणे विशेष १५ नोव्हेंबर २०२३ (बुधवार) रोजी दानापूर येथून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५.३५ वाजता पोहोचेल.
Railway
Railwayesakal

मुंबई : दिवाळी उत्सवात गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे/मुंबई आणि दानापूर दरम्यान ४ अतिरिक्त विशेष ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणे/मुंबई आणि दानापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१४८१ ०१४८२ दानापूर - पुणे विशेष १५ नोव्हेंबर २०२३ (बुधवार) रोजी दानापूर येथून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५.३५ वाजता पोहोचेल. तर, ट्रेन क्रमांक ०१४८३ पुणे - दानापूर अतिजलद विशेष १४ नोंव्हेबर २०२३ (मंगळवार) रोजी पुणे येथून संध्याकाळी ७.५५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्‍या दिवशी पहाटे ४.३० वाजता पोहोचेल.

या दोन्ही ट्रेन दौंड कर्ज लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं. बक्सर आणि आरा स्थानकांवर थांबणार आहे. ट्रेन क्रमांक ०१४८५सीएसएमटी - दानापूर विशेष १४ नोव्हेंबर २०२३ (मंगळवार) रोजी सीएसएमटी येथून रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं. बक्सर आणि आरा स्थानकांवर थांबणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com