Photo : आमदारकीची शपथ घेण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी केले हे शुभकाम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray reached to Siddhivinayak temple before MLA oath taking

आदित्य ठाकरे प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आणि आज त्यांनीही आमदारकीची शपथ घेतली. पण ते त्यापूर्वी शुभकाम करून निघाले.

Photo : आमदारकीची शपथ घेण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी केले हे शुभकाम!

मुंबई : ठाकरे कुटुंबातील सदस्याने म्हणजेच आदित्य ठाकरेंनी प्रथमच निवडणूक लढवली आणि जिंकलीही. महाविकासआघाडीच्या संघर्षानंतर आज (ता. 27) हे तीन पक्ष आपले बहुमत सिद्ध करून सत्तास्थापन करतील. आज सर्व आमदार विधानभवनात आमदारकीची शपथ घेतील. आदित्य ठाकरे प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आणि आज त्यांनीही आमदारकीची शपथ घेतली. पण ते त्यापूर्वी शुभकाम करून निघाले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विधानभवनात येण्यापूर्वी आदित्य ठाकरे हे शिनसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांसमवेत मातोश्रीबाहेर पडले व थेट प्रभादेवी येथे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचले. आमदारकीनंतर सत्तास्थापनेचा निर्णय झाल्यावर प्रथमच आदित्य सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते व सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकरही होते. 

आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरलं : संजय राऊत

महाविकासआघाडीची उजडली 'पहाट'; आमदारांचे शपथविधी सुरु

सिद्धीविनायकाच्या दर्शनानंतर आदित्य थेट विधानभवनात पोहोचले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मराठीतून शपथ घेतली. यावेळी शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी बाके वाजवून अभिनंदन केले. तर गॅलरीत खासदर सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यांनी देखील टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही

Web Title: Aditya Thackeray Reached Siddhivinayak Temple Mla Oath Taking

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv SenaAditya Thackeray
go to top