esakal | डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड गणेश धारगळकर यांची निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड गणेश धारगळकर यांची निवड

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली (Dombivali) नागरी सहकारी बँकेच्या (Bank) संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून बँकेच्या (Bank) अध्यक्षपदी (अ‍ॅड ) गणेश धारगळकर (Adv.Ganesh Dhargalkar) यांची तसेच उपाध्यक्षा नंदिनी कुलकर्णी (Nandini Kulkarni) यांची निवड करण्यात आली आहे.

2021 ते 26 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 13 जणांचे नवनिर्वाचित संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व उपनिबंधक महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था, पुणे दिलीप उढाण यांनी केली.

डोंबिवली नागरी सहकारी बँकेची सर्व साधारण सभा रविवारी पार पडली. यावेळी पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी विविध क्षेत्रातील 13 व्यक्तीचे नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवड प्रक्रिया पार पडली. हे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहे. निवडणूक निर्णय अधिका-यांच्या अध्यक्षतेत नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा झाली.

हेही वाचा: Corona Update: राज्यातील 'या' मंडळात एकही मृत्यू नाही, जाणून घ्या सविस्तर

या मंडळात सी.ए. जयंत पित्रे, महेश फणसे, मिलिंद आरोलकर, योगेश वाळुंजकर, जितेंद्र पटेल, लक्ष्मण खरपडे, योगेश चौधरी, सी.ए. विजय शेलार, सी.ए. अभिजित मराठे, पूर्वा पेंढरकर व . अ‍ॅड मेघना आंबेकर हे सदस्य संचालक म्हणून निवडून आले आहेत.

loading image
go to top