esakal | पालघर साधू हत्याकांडातील आरोपींसाठी सरसावली 'ही' संघटना; न्यायालयात वकीलपत्र सादर!
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर साधू हत्याकांडप्रकरणीतील आरोपींच्या मदतीला धावली 'ही' संघटना; वकिलपत्र दाखल...

देशभर चर्चेत असलेल्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना गुरुवारी (ता.20) डहाणूच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात हजर केले. या आरोपींना कायद्याचे संरक्षण मिळवून देण्यासाठी आदिवासी मुक्ती मोर्चा ही संघटना सरसावली आहे.

पालघर साधू हत्याकांडातील आरोपींसाठी सरसावली 'ही' संघटना; न्यायालयात वकीलपत्र सादर!

sakal_logo
By
चंद्रकांत खुताडे

डहाणू : देशभर चर्चेत असलेल्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना गुरुवारी (ता.20) डहाणूच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात हजर केले. या आरोपींना कायद्याचे संरक्षण मिळवून देण्यासाठी आदिवासी मुक्ती मोर्चा ही संघटना सरसावली आहे. संघटनेतर्फे ऍड. किरण भोईर यांनी गुरुवारी याप्रकरणी 40 आरोपींच्या बाजूने डहाणू दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकीलपत्र सादर केले. यासाठी आदिवासी मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष अनंता वनगा यांनी पुढाकार घेतला. दरम्यान, यापूर्वी 28 आरोपींना चार्जशीट दाखल न झाल्याने कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 

ही बातमी वाचली का? पदवीच्या गुणांवरही MBA प्रवेश मिळणार; तंत्र शिक्षण संस्थेचा महत्त्वपूर्ण निर्णय

लॉकडाऊनच्या काळात 16 एप्रिलला गडचिंचले येथे मोटार गाडीतून जाणाऱ्या दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची जमावाने निर्घृणपणे हत्या केली होती. या प्रकरणानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी दोन फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सुमारे 165 आरोपींना अटक करण्यात आली असून सीआयडीमार्फत तपास केला आहे. अटकेत असलेल्या आरोपींचे वकीलपत्र घेण्यास सुरुवातीपासून काही वकिलांनी पाठ फिरवली होती. त्यामुळेच आदिवासी मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष अनंता वनगा यांनी निरपराध आरोपींना कायद्याचे संरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले. त्यानंतर वाडा तालुक्‍यातील वकील ऍड. किरण भोईर यांनी 40 जणांचे वकीलपत्र दाखल केले आहे. 

ही बातमी वाचली का? गणेशोत्सवाची मुंबई, ठाणेकरांना भेट; मोडकसागर, तानसापाठोपाठ आणखी एक धरण ओव्हरफ्लो

आदिवासी मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष अनंता वनगा यांच्या आग्रहाखातर याबाबत वकीलपत्र घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला कायद्याचे संरक्षण दिले आहे. याप्रकरणी निरपराध आरोपींची बाजू सन्माननीय न्यायालयात मांडणे आव्हानात्मक आहे. कायद्याच्या चौकटीत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न असेल. 
- किरण भोईर, वकील. 

----------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

loading image
go to top