३३ वर्षानंतर मिळाली आईची चेन, फक्त आज आई असायला हवी होती..  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुंबई - मुंबई पोलिस सतत लोकांच्या समस्या सोडवण्याच काम करत असतातच. मात्र आज मुंबई पोलिसांनी ३३ वर्षांपासून रखडत  पडलेली चोरी केस सोडवलीये.  मुंबई पोलिस सध्या लोकांना त्यांच्या चोरी झालेल्या अमूल्य वस्तु आणि दागिने परत करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत तब्बल २ कोटींचे दागिने लोकांना सुपूर्त केलेत. दिलीप शहा यांना आज पोलिसांनी त्यांच्या आईची ३३ वर्षांपूर्वी चोरीला गेलेली सोन्याची चेन परत केली आणि त्यांना अश्रु अनावर झाले. मुंबई पोलिस अजूनही काही दागिने गुढीपाडव्याला सुपूर्त करणार आहेत.

मोठी बातमी - मंगेशकर कुटुंबाची फडणवीसांवर नाराजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले..

आज आई असायला हवी होती

दिलीप शहा यांच्या आईची सोन्याची चेन तब्बल ३३ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८६ मध्ये एका देवळासमोरून मारण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करूनही चेन मिळाली नाही. त्यांनी आणि त्यांच्या आईंनी चेन परत मिळेल ही आशा देखील सोडली. आज चेन परत मिळते मिळालीये, मात्र हे सुख बघायला त्यांची आई या जगात नाही. म्हणूनच शहा यांना अश्रु अनावर झाले. आता ही चेन ताब्यात मिळाली की शाह कुटुंब ही चेन देवळात दान करणार आहेत.

मोठी बातमी - जाऊदे यावर्षी भाड्याच्या घरात राहू, पुढच्या वर्षी पाहू..

 तो आनंदच वेगळा

असाच काहीसा प्रकार भाईंदरमध्ये राहणार्‍या भावना देसाई यांच्यासोबत देखील घडला. विद्याविहार स्टेशनवरुन त्यांची चेन चोरीला गेली होती. आपल्या वडिलांबरोबर पोलिसात तक्रार नोंदवली मात्र त्यांना चेन मिळाली नव्हती. आज ती मिळाल्याने यासारखा दूसरा आनंद नाही असं त्या म्हणाल्या.

Photo - उदयन राजेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं थेट उत्तर, मुंबईत लागले पोस्टर्स..

आतापर्यंत मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले नागरिकांचे दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु आणि पैसे परत दिले आहेत. अजूनही काही गोष्टी गुढीपाडव्याला लोकांना परत दिल्या जाणार असल्याचं जीआरपी कमिशनर रविंद्र सेंगावकर यांनी म्हंटलय. 

after 33 years mumbai police found lost chain of dilip shahs mother

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after 33 years mumbai police found lost chain of dilip shahs mother